
पुणे : 'आत्मनिर्भर भारत' अभियानाचा एमएसएमई (सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग) हा कणा असून, पारंपारिकतेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत नवउद्योजक तयार झाले पाहिजेत. ज्ञानाचे संपत्तीत रुपांतर करणे आणि टाकाऊपासून टिकाऊ उत्पादन निर्मितीकडे वाटचाल करणे आवश्यक आहे.
मत्सव्यवसाय, मधमाशी पालन, मशरुम उत्पादन, बांबू उत्पादन आणि त्याच्याशी संबंधीत लघुउद्योगांना जागतिक बाजारपेठेत पण खूप मागणी आहे. त्यासाठी दर्जा, संशोधन आणि प्रयोगशीलता या त्रिसूत्रींचे पालन करणे आवश्यक आहे, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन तसेच सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
पुणे येथील एनवायसीएस अर्थात, नॅशनल युवा कोऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे "एमएसएमई (सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग) क्षेत्रातील नव्या संधी" या विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी गडकरी बोलत होते. या वेबिनार चर्चेत एन. वाय.सी.एस.चे अध्यक्ष प्रकाश चन्द्र साहू आणि एन.वाय.सी.एस.चे चेअरमन राजेश पांडे हे देखील सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, पाश्चात्य देशांपेशा भारतात नैसर्गिक स्त्रोत मुबलक प्रमाणात उपलब्धत आहेत. तसेच भारतीय संस्कृतीवर आधारीत पांरपरिक कलात्मकता आपल्यात भिनलेली आहे. त्याच गुणांचा मेळ घालत आपण आपल्यातील उद्यमशीलता विकसित केली, तर अनेक संधी आपल्यापुढे नतमस्तक होतील. कोणताही व्यवसाय हा कमी दर्जाचा नसतो. त्यात तुम्ही दर्जा टिकविला तर ग्राहक तुमच्याशिवाय दुसरीकडे जात नाहीत. निर्यातीचा दर्जा टिकवत पॅकेजींगसह इतर बाबींवर लक्ष केंद्रित केले, तर जागतिक बाजारपेठेची दारे खुली होतात. आत्मनिर्भर भारत अभियानात प्रामुख्याने निर्यात वाढून आयात कशी कमी होईल या दृष्टीने काम सुरु आहे.
प्रारंभी एन.वाय.सी. एस.चे चेअरमन राजेश पांडे यांनी या वेबिनारच्या आयोजनामागची भूमिका विषद करीत कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर एन.वाय.सी.एस.चे अध्यक्ष प्रकाश चन्द्र साहू यांनी आभार मानले.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by : Ashish N. Kadam)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.