Chandni Chowk Flyover : चांदणी चौक पुलाच्या लोकार्पणावेळी गडकरी मेधा कुलकर्णींना विसरले नाहीत; सांगितली 'ती' आठवण

NItin Gadkari on medha kulkarni Chandni Chowk Flyover inauguration Ajit Pawar Devendra Fadnavis
NItin Gadkari on medha kulkarni Chandni Chowk Flyover inauguration Ajit Pawar Devendra Fadnavis

Pune News : चांदणी चौकातील उड्डाणपुलाचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण आज पार पडलं. पुण्यातील कोथरुड येथील चांदणी चौक परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या नव्या उड्डाण पुलामुळे मोठी मदत होणार आहे. यादरम्यान या लोकार्पण सोहळ्यापूर्वी भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. भाजपच्या नेत्या आणि कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी "असे निष्ठावंतांचे डावललेले जिणे" अशा आशयाची पोस्ट लिहीत नाराजी व्यक्त केली होती.

फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये चांदणी चौक उद्घाटन कार्यक्रमाची कोथरूडमधील पत्रके पहिली आणि खूप वाईट वाटलं असं मेधा कुलकर्णी म्हणाल्या. तसेच चांदणी चौक या विषयाचे सर्वस्वी श्रेय नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांना आहे. पण मुळातच त्यांच्याकडे हा विषय नेला कोणी? असा प्रश्नही त्यांनी विचारला होता.

या नाराजीदरम्यान आजच्या लोकार्पण कार्यक्रमात गडकरी हे मात्र कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी विसरले नाहीत. गडकरींनी भाषणात मेधा कुलकर्णी यांनी चांदणी चौकातील पुलासाठी वेळेवेळी निवेदन दिल्याचे सांगितले.

NItin Gadkari on medha kulkarni Chandni Chowk Flyover inauguration Ajit Pawar Devendra Fadnavis
Chandni Chowk Flyover : "...आम्ही काय बेअक्कल आहेत का?"; पुण्यातील कार्यक्रमात अजित पवार संतापले!

काय म्हणले नितीन गडकरी?

मी २०१४ मध्ये मंत्री झाल्यानंतर २०१५-१६ मध्ये पुण्यात अनेक वेळा येण्याची संधी मिळाली. यावेळी तीन गोष्टींची चर्चा व्हायची. त्यामुळे पुणे मेट्रो, विमानतळाच्या विकासासाठी डिफेंन्सची जागा मिळण्याची मागणी आणि तिसरी मागणी चांदणी चौकातल्या वाहतुक कोंडीसाठी पुल बांधण्याची मागणी होती. गडकरी म्हणाले की, तेव्हा अनिल शिरोळे त्यानंतर गिरीश बापट खासदार होते, मेधा कुलकर्णी आमदार होत्या. या सगळ्यांनी मला वेळोवेळी निवेदनं दिली. त्यातल्या दोन गोष्टी पूर्णत्वाला पोहचल्या आहेत असेही गडकरी म्हणाले.

NItin Gadkari on medha kulkarni Chandni Chowk Flyover inauguration Ajit Pawar Devendra Fadnavis
Chandni Chowk Flyover : काल नाराजी, आज हजेरी! लोकार्पण कार्यक्रमात मेधा कुलकर्णी व्यासपीठावर पहिल्या रांगेत

मेधा कुलकर्णींची पोस्ट आहे तशी...

" असे निष्ठावंतांचे डावललेले जिणे "

माझ्यावरील कुरघोडया, डावलणे याबद्दल मी कधी जाहीर वाच्यता केली नव्हती. विश्वासात न घेता अचानक निर्णय घेतले तेव्हाही.. पण आता दुःख मावत नाही मनात.. वाटले बोलावे तुमच्याशी. चांदणी चौक उद्घाटन कार्यक्रमाची कोथरूडमधील पत्रके पहिली आणि खूप वाईट वाटले. चांदणी चौक या विषयाचे सर्वस्वी श्रेय Nitin Gadkari जी आणि Devendra Fadnavis यांना आहे. पण मुळातच त्यांच्याकडे हा विषय नेला कोणी? स्वतः आदरणीय गडकरीजी काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात जाहीर भाषणात म्हणाले की, "तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी ताईंच्या सांगण्यावरून मी हा मुद्दा घेतला". अनेक असे संदर्भ देता येतील की ज्यात 'कोथरूडचे आधुनिक कुठलेच नेते' या विषयी सहभागी नव्हते, तेव्हापासून सतत पाठपुरावा केला होता. आता मात्र सर्व श्रेय एकट्याचेच असल्यासारखे वागणारे कोथरूडचे सद्य नेते.. माझ्या सारख्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का? मध्यंतरी आदरणीय मोदी जी, आदरणीय अमित शाह जी पुण्यात येऊन गेले. ठराविक लोकांना प्रोटोकॉल सोडून 'सर्व ठिकाणी' चे पास होते. मी राष्ट्रीय पदावर असून, विनंती करूनही मला दिला नाही. साधे कोथरूड च्या मंडल अध्यक्ष पदाच्या प्रक्रियेतही समाविष्ट श्रेणी मध्ये मी अपेक्षित नसेन तर याचा अर्थ स्थानिकांना मी नको आहे. गेली अनेक वर्षे मी हे सहन करीत आहे. त्या त्या वेळी गोष्टी वरीष्ठांपुढे मांडल्या आहेत.

देशापुढील आव्हाने, त्यासाठी करायचे अपेक्षित संघटन सोडून, तसेच मा मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी एकदिलाने कार्य करायचे सोडून, हे स्वतःच्या स्वार्थासाठी विघटनाचे, काटाकाटीचे राजकारण करत आहेत. माझ्या सारख्या निष्ठावान कार्यकर्तीला जाणीव झाली की माझी काही किंमत नाही आहे.

माझ्या बाबत त्यांना असे करणे सोपे जाते. माझ्याकडे ना मसल पॉवर, ना मनी पॉवर. मी एका सामान्य कुटुंबातून आलेली, विचारधारा घरून निष्ठेने काम करणारी कार्यकर्ती आहे. एका वैचारिकतेतून राजकारणात प्रवेश केला. आणि अगदी मनापासून सर्व समाजातील लोकांची कामे केली. आजही जे सोपवले आहे ते करीतच आहे. त्यावर असा बोळा फिरवला जातो आहे हे आता मात्र असह्य होऊन गेले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com