
पुणे : लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा ४३ वा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण लोकमान्य टिळक यांच्या १०५ व्या पुण्यतिथीला एक ऑगस्टला सकाळी साडेदहा वाजता टिळक स्मारक मंदिरात होणार आहे, अशी माहिती टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांनी पत्रकार परिषदेत दिली.