बिरबल साहनीचे करमळकर अध्यक्ष

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 मे 2018

पुणे : लखनौ येथील बिरबल साहनी पुरातत्त्व शास्त्रीय संस्थेच्या अध्यक्षपदी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने ही नियुक्ती केली आहे. बिरबल साहनी पुरातत्त्वशास्त्रीय संस्था वनस्पतिशास्त्र आणि भूरचनाशास्त्र यासंबंधी पुरातत्त्वशास्त्रीय क्षेत्रातील नावाजलेली संस्था आहे. संस्थेच्या माध्यमातून पृथ्वीवरील सुरवातीच्या काळातील जीवांमधील विविधता, जीवाश्‍म इंधन, वनस्पती प्रेरक शक्ती, हवामानातील विविधता आणि बदल, जंगलांचे संवर्धन, अशा विषयांवर संशोधन केले जाते.

Web Title: Nitin Karamlakar president of Birbal Sahni Archaeological classical organization