लाज वाटती मला या समाजाची! महिलेचा हृदयस्पर्शी अनुभव

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जून 2019

भारतीय जवानांबद्दल प्रत्येक भारतीयाच्या मनात आदर असून, वेळोवेळी तो दिसून येतो. जवानांबद्दल आदर असला तर अगदी त्याच्या उलट अनुभव पुण्यातील राजश्री थोरात या महिलेला आला आहे.

पुणे : भारतीय जवानांबद्दल प्रत्येक भारतीयाच्या मनात आदर असून, वेळोवेळी तो दिसून येतो. जवानांबद्दल आदर असला तर अगदी त्याच्या उलट अनुभव पुण्यातील राजश्री थोरात या महिलेला आला आहे. त्यांचे पती नितीन थोरात यांनी हा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. राजश्री यांचा अनुभव मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्य माध्यमातून व्यक्त होत आहेत.

प्रसारमाध्यमांशी बोलताना नितीन म्हणाले की, 'या लिखाणातून माझ्या पत्नीच्या कृतीचे कौतुक होणे मला अपेक्षित नाही. पण त्यातून एकाने तरी बोध घेतला तरी त्याचे सार्थक होईल'.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nitin thorats facebook post on soldier lift and touching experience of the woman