
खेड-शिवापूर(Pune) : "तुम्ही फक्त शटर वाजवा, आम्ही आतमध्येच आहोत" अशी परिस्थिती सध्या खेड-शिवापूर(Khed- Shivapur) परिसरात सुरू आहे. येथील अनेक व्यावसायिक पोलिसांना(Police) न जुमानता सकाळी अकरानंतरही दुकाने सुरू ठेवत आहेत. तर पोलिसांना (Police) पत्र देऊनही पोलिस संबंधित दुकानदारांवर कारवाई करत नाहीत, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.(no action taken by police against shopkeeper for opening shop even after 11am despite In Khed-Shivapur)
अत्यावश्यक सेवेतील व्यावसायिकांना सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र पुणे-सातारा रस्त्यावर खेड-शिवापूर (ता.हवेली) आणि वेळू (ता.भोर) परिसरातील अत्यावश्यक सेवेतील अनेक विक्रेते सकाळी अकरा नंतरही दुकाने सुरू ठेवत आहेत. विशेष म्हणजे हे दुकानदार पोलिसांनाही जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. कोंढणपूर फाट्यावर भाजी विक्रेते, मोबाईल दुकानदार, दूध विक्रेते तर वेळू फाट्यावर दूध विक्रेते, किराणा दुकानदार, बेकरी व्यावसायिक, चिकन विक्रेते सकाळी अकरा नंतर चोरून दुकाने सुरू असल्याचे दिसून येत आहे. ही दुकाने चोरून अकरा नंतरही सुरू असल्याने विविध साहित्य खरेदी करण्यासाठी नागरीक सकाळी अकरानंतरही बाहेर पडत आहे. यावरून कोरोनाच्या भयानक परिस्थितीचे या परीसरात गांभीर्य राहिले नसल्याचे स्पष्ट होत आहे. तर पोलिस आणि प्रशासनाचाही त्यावर वचक नसल्याचे दिसून येत आहे.
याशिवाय सोशल डिस्टनसिंग, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना याचे हे दुकानदार पालन करत नाहीत. शासनाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या या दुकानदारांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली जात आहे. याबाबत श्रीरामनगरचे ग्रामसेवक विजयकुमार गरुड म्हणाले, "सकाळी अकरा नंतर जे व्यावसायिक दुकाने सुरू ठेवत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही पोलिसांना पत्र दिले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांना बोलविले तरी पोलिस येत नाहीत." तर राजगडचे फौजदार निखिल मगदूम म्हणाले, "आम्हाला असे पत्र मिळालेले नाही. मात्र पोलिस प्रत्येक गावात जाऊन कारवाई करत आहेत."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.