पुण्यावर आलेलं ऑक्सिजनचं संकट; 2 प्रकल्प अचानक पडले बंद

दोन प्रकल्प अचानक बंद पडल्यामुळे स्थिती
Oxygen
OxygenCanva

पुणे(pune) : पुण्याला ऑक्सिजन(Oxygen) पुरवठा करणारे टायो निप्पॉन (Taiyo Nippon) आणि लिंडे इंडिया(LINDEINDIA) हे प्रकल्प सोमवारी अचानक बंद पडले; परंतु प्रशासनाच्या वॉर रूममधून (War Room) झालेल्या वेगवान प्रयत्नानंतर फ्रान्स(France) सरकारचा ३० मेट्रिक टन(Metric ton) आणि रायगडच्या डॉल्व्ही(Dolvi, Raigad) कंपनीमार्फत ४५ मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकला. त्यामुळे शहरावरील मोठे संकट टळले. दरम्यान, ओडिशावरून (Orrisa) नागपूरला (Nagpur) ५८ टनांचे टँकर घेऊन जाणारी रेल्वे पुण्यात रात्री पोचली आहे. तसेच, बंद पडलेले दोन्ही ऑक्सिजन प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यामुळे बुधवारी पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे.

Oxygen
मायबाप, आम्हालाबी द्या की लस!

पुणे जिल्ह्याला टायो निप्पॅान या कंपनीकडून दररोज ३० टन ऑक्सिजनचा पुरवठा होतो. तर, लिंडे कंपनीच्या तळोजा आणि मुरबाड येथील प्रकल्पांमधून १२० टन ऑक्सिजन उपलब्ध होतो; परंतु या दोन प्रकल्पांमध्ये तांत्रिक अडचणी झाल्यामुळे पुण्याला ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकला नाही. हे दोन्ही प्रकल्प मंगळवारी सुरू झाले; परंतु प्रत्यक्ष ऑक्सिजन निर्मितीसाठी १८ तास लागतात. यावर विभागीय आयुक्त सौरभ राव आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी राज्य सरकारशी संपर्क साधून कोठून ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकतो, यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे ऑक्सिजनचे ओढवलेले संकट टळले.

या संदर्भात विभागीय आयुक्त राव म्हणाले, ‘‘फ्रान्स सरकारकडून ४० टन ऑक्सिजन देशासाठी प्राप्त झाला होता. त्यापैकी ३० टन ऑक्सिजन महाराष्ट्राला मिळाला. तो सर्व ऑक्सिजन पुण्याला प्राप्त झाला. रायगडच्या डॉल्व्ही कंपनीकडून मंगळवारी ४५ टन ऑक्सिजन घेण्यात आला. ओडिशातील अनगुल येथून नागपूरला जाणारी रेल्वे पुण्याकडे वळविण्यात आली. ही रेल्वे मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास लोणी स्थानकावर दाखल झाली. या चार टँकरद्वारे पुण्यासाठी ऑक्सिजनचा ५८ टन साठा उपलब्ध झाला आहे.

Oxygen
पुण्यात ऑक्सिजनची बचत करण्यावर भर

ऑक्सिजनच्या मागणीत घट

सध्या ऑक्सिजनच्या वापराबाबत ऑडिट सुरू आहे. त्यामुळे ससून रुग्णालय, वायसीएम, बाणेर, मगर क्रीडांगण, पिंपरी आणि शिवाजीनगर येथील सीओईपी या कोविड केअर सेंटरमधील आणि काही खासगी रुग्णालयांमधील ऑक्सिजनच्या मागणीत घट झाली आहे. खासगी रुग्णालयांची ऑक्सिजनची मागणी दहा टनांनी कमी झाली आहे, असे विभागीय आयुक्त राव यांनी सांगितले.

Oxygen
पुण्यात पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस दाखल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com