काॅंग्रेसचे हे नेते म्हणतात, 'विरोधकांनी लक्षात ठेवावं, आमचं सरकार पाच वर्षे टिकणारच'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

गेल्या महिन्याभरापासून पेट्रोल-डिझेल दरवाढ होत आहे. त्याच्या निषेधार्थ शहर काँग्रेसच्या वतीने टिळक चौकात आज आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनाला प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी हजेरी लावली. परंतु दोन वगळता अन्य नगरसेवक आणि शहराचे पदाधिकारी आंदोलनाच्या ठिकाणी फिरकले देखील नाहीत.

पुणे : पेट्रोल- डिझेल दरवाढीवरून केंद्र सरकारच्या निषेधार्थ शहर काँग्रेसने आयोजित केलेल्या आंदोलनातील उपस्थितीवरून पक्षातील गटबाजीचे सोमवारी पुन्हा दर्शन घडले. या आंदोलनाला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांनी हजेरी लावली, परंतु शहर प्रमुख पदाधिकारी आणि नगरसेवकांनी मात्र दांडी मारली. त्यामुळे पक्षात हा चर्चेचा विषय झाला होता. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

गेल्या महिन्याभरापासून पेट्रोल-डिझेल दरवाढ होत आहे. त्याच्या निषेधार्थ शहर काँग्रेसच्या वतीने टिळक चौकात आज आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनाला प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी हजेरी लावली. परंतु दोन वगळता अन्य नगरसेवक आणि शहराचे पदाधिकारी आंदोलनाच्या ठिकाणी फिरकले देखील नाहीत. याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे चौकशी केली असता, सोशल डिस्टसिंग पाळून आंदोलन करावयाचे ठरले होते. पोलिसांकडे देखील 25 जणांसाठीच परवानगी मागितली होती. त्यामुळे प्रदेशाचे पदाधिकारी, सर्व फ्रंटचे अध्यक्ष, नगरसेवक आणि ब्लॉक अध्यक्ष यांनाच आंदोलनात सहभागी होण्यासाठी निरोप देण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले. 

'पुण्याची पीएमपी व्हेंटिलेटरवर; करार रद्द करण्यासाठी कंत्राटदारांना नोटिस

प्रत्यक्षात नगरसेवकांकडे चौकशी केल्यानंतर अनेकांनी आपल्याला निरोपच मिळाला नसल्याचे सांगितले. प्रदेशने नव्हे, तर शहर काँग्रेसने हे आंदोलन आयोजित केले होते. ब्लॉक अध्यक्षांना बोलविता, परंतु शहर पदाधिकाऱ्यांना नाही. हा कुठला प्रकार आहे. पक्षाच्या घटनेला हरताळ पाळून काम सुरू आहे. जाणीवपूर्वक अशी वागणूक दिली जात असल्याचा आरोप शहराच्या पदाधिकाऱ्यांनी केला. 

StartupStory: सोशल डिस्टन्सिंगसाठी तरुणानं डोकं लढवलं; तुम्हीही कराल कौतुक

नुकतीच झालेली विधानसभा निवडणूक, त्यानंतर विधान परिषदेसाठी चाललेली चढाओढ आणि महापालिकेतील गटनेते बदल अशा अनेक कारणांमुळे सध्या शहर काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून आली आहे. मर्जीतील पदाधिकाऱ्यांना निरोप देण्यासारखे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यातून या आंदोलनाला देखील अनेक पदाधिकाऱ्यांनी दांडी मारली असल्याचे कारण पक्षातील सूत्रांनी सांगण्यात आले. 

खेकडे, मासे पकडणाऱ्यांच्या हाती आले टॅब

प्रदेशाध्यक्ष थोरात यांना याबद्दल विचारले असता, त्यांनी मात्र याला उत्तर देणे टाळले. ते म्हणाले," येथे गटातटाचे कोणतेही राजकारण नाही. आम्ही सर्वजण एकच आहोत. केंद्र सरकारच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत आहे. कामानिमित्त काही जण आले नसतील. जेथे असतील, तेथून ते केंद्र सरकारचा निषेध केला आहे.''  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no corporators and officers for Agitating against hike in petrol price in pune