ब्रेकडाऊन बसवर कारवाई नको

Bus
Bus

पुणे - देखभाल दुरुस्ती झालेली बस मार्गावर बंद पडल्यास कार्यशाळेतील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. तसेच, बंद पडलेल्या बसला जॅमर लावून सुमारे पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करू नये, अशी मागणीही पीएमपीने पोलिसांकडे केली आहे.

ब्रेकडाऊन झालेल्या बसमुळे वाहतुकीला अडथळा होतो, असे म्हणत वाहतूक पोलिसांनी जॅमर लावून प्रती बस पाच हजार रुपये दंड आकारण्यास सुरवात केली आहे. एका महिन्यात आठ बसवर अशा प्रकारची कारवाई झाली आहे.

त्यामुळे पीएमपीच्या अडचणीत भर पडली आहे. पोलिसांनी जॅमरचा वापर करून दंड आकारणी करू नये, अशी मागणी वाहतूक पोलिसांकडे केल्याचे पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी सांगितले. 

चालक बस मुद्दाम बंद पाडत नाही. पीएमपी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे. त्यातच पाच हजारांच्या दंडाचे प्रमाण जास्त आहे. शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील सार्वजनिक वाहतुकीची गरज लक्षात घेऊन कारवाईचा 
फेरविचार करावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.

प्रवासी बस मोकाट 
शहरातील स्वारगेट, पुणे स्टेशन आणि शिवाजीनगर एसटी स्थानकांसमोर दिवसा खासगी बस उभ्या राहून प्रवासी गोळा करतात. एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत १८० पत्रे वाहतूक पोलिसांना पाठविली. रुबी हॉल रुग्णालयाजवळही सायंकाळपासून खासगी बस रस्त्यावर उभ्या राहतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. मात्र, त्यांच्याकडे वाहतूक पोलिस काणाडोळा करीत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, पीएमपी बसवर कारवाई करण्यास वाहतूक पोलिस तत्परता दाखवीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com