esakal | पुणे : लॉकडाऊनबाबत जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची घोषणा; म्हणाले, 'लॉकडाऊन होणार...'
sakal

बोलून बातमी शोधा

Pune_Lockdown

पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.११) घेतलेल्या बैठकीत लॉकडाऊनबाबत वेगवेगळे मतप्रवाह समोर आले आहेत.

पुणे : लॉकडाऊनबाबत जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची घोषणा; म्हणाले, 'लॉकडाऊन होणार...'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आल्याची अफवा शहरात पसरली. मात्र, जिल्ह्यात लॉकडाऊनबाबत कोणताही निर्णय झालेला नाही, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. त्यामुळे लॉकडाऊन ही अफवाच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मराठा आरक्षणावरून शासनाचाच 'गोंधळात गोंधळ'; सुधारित आदेश काढल्याने विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा​

पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. या संदर्भात पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.११) घेतलेल्या बैठकीत लॉकडाऊनबाबत वेगवेगळे मतप्रवाह समोर आले आहेत. शहरात लॉकडाऊन शिथील करण्याबाबत व्यापाऱ्यांनी आग्रह धरला होता. तसेच उद्योजक आणि इतर क्षेत्रांमधून लॉकडाऊन उठविण्याची मागणी करण्यात येत होती.

या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनबाबत नियम शिथिल करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले होते. त्यावरून पुन्हा शहरात लॉकडाऊन होणार असल्याची चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावरही लॉकडाऊनचे संकेत अशी बातमी व्हायरल झाली. मात्र, ही केवळ अफवाच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी : शैक्षणिक शुल्क होणार कमी? समितीच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष​

दरम्यान, जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या वाहनांना अॅम्बुलन्सचा दर्जा देण्यात आला आहे. मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा तातडीने उपलब्ध व्हावा, याबाबत पोलिस आणि प्रादेशिक परिवहन विभागाने कार्यवाही करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिल्या आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image