पुणे महापालिकेत मास्क शिवाय प्रवेश नाही

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन करणे आवश्‍यक आहे.
Mask
MaskSakal

पुणे - कोरोनाच्या प्रभाव कमी झाला म्हणून मास्क न वापरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. महापालिका भवनामध्ये देखील नागरिक, नगरसेवक, कार्यकर्ते मास्क न लावता बिनधास्त फिरत आहेत. त्यामुळे आता प्रशासनाने अशा नागरिकांवर कारवाई करण्यास सुरवात केली आहे. मास्क नसेल तर महापालिकेत प्रवेश मिळणार नाही, असे आदेश देण्यात आहे आहेत.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन करणे आवश्‍यक आहे. राज्यात ओमिक्रॉनचा धोका वाढल्याने राज्य सरकारने नवे निर्बंध लादले आहेत. पुण्यात देखील या नव्या विषाणूनचे रुग्ण आढळल्याने खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे केले जात आहे. तरीही अद्याप अनेक नागरिक बिनधास्तपणे नियमांचे पालन न करता शहरात फिरत आहेत.

महापालिका भवनात रोज हजारो नागरिक विविध कामासाठी येतात. त्यावेळी अनेकांच्या तोंडावर मास्क नसतो. मास्क असला तरी तो हनुवटीला लावतात किंवा खिशामध्ये ठेवत आहेत. अशा नागरिकांवर आजपासून (ता.१०) प्रशासनाने कारवाई करून ५०० रुपये दंड ठोठावण्यास सुरवात केली आहे.

Mask
पुण्यातील ओमिक्रॉनचे सातपैकी पाच रुग्ण उपचारानंतर पूर्णपणे बरे

उपायुक्त माधव जगताप म्हणाले, ‘‘आजपासून महापालिकेत कारवाई सुरू केली असून, एका व्यक्तीला ५०० रुपयांचा दंड केला आहे. मास्क घातल्याशिवाय महापालिकेत कोणालाही प्रवेश मिळणार नाही. तसेच शहरात क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे.

टार्गेटचा निर्णय ठरला होता वादग्रस्त

सुमारे दोन महिन्यांपूर्वी नागरिक मास्क घालत नसल्याने कारवाईचे प्रमाण वाढावे यासाठी प्रशासनाने आदेश काढला त्यामध्ये रोज १० लाख रुपयांचा दंड वसूल करण्याचे टार्गेट देण्यात आले होते. हे परिपत्रक सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर यावर टीकेची झोड उठली होती. अखेर हा आदेश मागे घेत कोणतेही टार्गेट दिले नव्हते अशी सारवासारव प्रशासनाने केली होती. दरम्यान, आता पुन्हा एकदा आदेश काढले आहेत, पण त्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत दंडात्मक कारवाई करून त्याचा अहवाल रोज पाठवावा असे आदेश क्षेत्रीय कार्यालयांना उपायुक्त जगताप यांनी दिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com