No Hawking Day : पुणेकरांनो, हॉर्न नॉट ओके प्लीज...

ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी 'नो हॉकिंग डे'निमित्त जनजागृती
Horn Not Ok Please
Horn Not Ok Pleasesakal

पुणे - ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी ‘नो हॉकिंग डे’ अर्थात ‘नो हॉर्न डे’ निमित्त पुणेकरांनी बालगंधर्व रंगमंदिर चौकात जनजागृती केली. ज्येष्ठांसह महाविद्यालयीन तरुण आणि वाहतूक पोलिसांनी सहभाग घेत ‘पुणेकरांनो हॉर्न वाजवू नका,’ असे सांगत वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.

लाइफ सेव्हिंग फाउंडेशन, पुणे शहर वाहतूक पोलिस आणि नवचैतन्य हास्ययोग परिवार यांच्या वतीने ‘नो हॉकिंग डे’ संकल्पना राबविण्यात आली. शहरात विविध ठिकाणी ‘नो हॉकिंग डे’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिर चौक येथे मुख्य जनजागृतीपर कार्यक्रम झाला.

शहर वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त जगदीश सातव, मॉडर्न महाविद्यालयाचे प्रा. राजेंद्र झुंजारराव, नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे विठ्ठल काटे, एकपात्री कलाकार मकरंद टिल्लू, लायन्स क्लब पुणे लोटसचे अध्यक्ष प्रसन्न पाटील, लाइफ सेव्हिंग फाउंडेशनचे देवेंद्र पाठक, प्रा. पद्माकर पुंडे, संग्राम खोपडे आदी या वेळी उपस्थित होते.

मॉडर्न महाविद्यालयातील ‘एनएसएस’चे विद्यार्थी उपक्रमात सहभागी झाले होते. त्यानंतर प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न महाविद्यालयात मुख्य कार्यक्रम पार पडला. उपक्रमाचे यंदा पाचवे वर्ष आहे.

मकरंद टिल्लू म्हणाले, ‘वाढत्या ध्वनी प्रदूषणामुळे नागरिकांना उच्च रक्तदाब, हृदयरोग, मानसिक ताण, चिडचिडेपणा, नैराश्य आणि बहिरेपणा या त्रासांचा सामना करावा लागत आहे. हे टाळण्यासाठी ‘नो हॉर्न’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविणे गरजेचे आहे.’ देवेंद्र पाठक म्हणाले, ‘अनेकदा अनावश्यक हॉर्न वाजविले जातात.

त्यामुळे नागरिकांना दुष्परिणामांना सामारे जावे लागते. हॉर्न न वाजवता वाहन चालविणे शक्य असून, तसा प्रयत्न आपण करायला हवा.’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पद्माकर पुंडे यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com