'नो हॉर्न डे' झाला कर्कश

'नो हॉर्न डे' झाला कर्कश

कात्रज : वाहतूक कोंडीची तमा न बाळगता सीएनजी गॅस भरण्यासाठी पंपात जास्ती वाहने कशी येतील, या प्रयत्नात असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या आडमुठे पणामुळे कोंडीत अडकलेल्या नागरिकांनी जोरजोरात हॉर्न वाजवून निषेध व्यक्त केला. वैतागलेल्या नागरिकांचा संयम सुटला आणि 'नो हॉर्न डे' अक्षरश: कर्णकर्कश झाल्याची घटना भारती विद्यापीठ परिसरात दिवसभर अनेकदा घडली.

रखडलेला रस्त्यांचा विकास अतिक्रमणांनी आकसलेले चौक आणि चौफेर येणाऱ्या वाहतुकीने हतबल झालेले वाहतूक पोलिसांमुळे भारती विद्यापीठामागील रस्ते आणि सर्वच चौकातील कोंडीने नागरीकांचा श्वास कोंडला आहे. सरहद स्कूलचा पुणे काश्मिर मैत्री चौक हा तर नव्याने सुरू झालेल्या सीएनजी पंपामुळे कोंडीत अडकला आहे. सातत्याने होणार्या वाहतूक कोंडीत अडकणारे नागरीक हैराण झाले आहेत. अत्यंत अरूंद  राजाराम गॅस एजन्सीचा कॉर्नर सीएनजी पंपात येणाऱ्या वाहनांच्या रांगांनी व्यापून जात आहे. परिणामी सामान्य वाहतुकीचा आधिकार संपुष्टात आला आहे. या पंप चालकाने पंपामुळे होणारी वाहतूक समस्या धाब्यावर बसवून केवळ स्वत:च्या फायद्याचाच विचार केला आहे.

कात्रज डेअरी सिमाभींतीलगत दिवसभर रिक्षा,टेंपो,मोटारींची रांग लागते. खासगी रक्षक चार ते पाच वाहने अंदाज घेवून पंपाकडे सोडतात. मात्र गर्दीच्या वेळी हा प्रयोग नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहेत. खासगी रक्षक वाहतूक नियंत्रित करतात असा आव आणतात. मात्र ते पंपाकडे जास्तीत जास्त वाहने कशी जातील याचाच विचार करतात. नागरीक संतापले की वादावादी आणि भांडणं होतात. या गोंधळात कोंडी वाढून रांगा लागणे आणि परिसरातील वाहतूक विस्कळीत होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. पुणे वाहतूक पोलिस आणि आरटीओ चा 'नो हॉर्न डे' सुध्दा याला अपवाद ठरला नाही. जास्तीतजास्त वाहने पंपाकडे जावीत यासाठी प्रयत्न करणार्या रक्षकाचा निषेध नागरिकांनी थेट जास्त वेळ हॉर्न वाजवून केला. 

विनाकारण हॉर्न वाजवून सार्वजनिक आरोग्याला अपायकारक ठरणाऱ्या ध्वनीप्रदुषणास रोखण्याचे संस्कार नागरिकांवर करण्याच्या प्रयत्नांचे स्वागत सर्वत्र झाले. मात्र मानवनिर्मीत वाहतूक कोंडीच्या ठिकाणी सजग नागरिकांना मात्र 'नो हॉर्न डे' सारख्या उपक्रमाला नाईलाजाने बगल द्यावी लागली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com