Onion ExportSakal
पुणे
Onion Export : आवक वाढल्याने कांद्याचे दर अजूनही जैसे थे; निर्यातशुल्क हटविण्यास विलंब झाल्याचा परिणाम
Farmers Issues : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील शुल्क उशिरा हटवल्यामुळे बाजारभावात कोणताही फरक पडलेला नाही. पुणे आणि लोणंद बाजार समित्यांमधील कांद्याचे दर पूर्ववत असून, आवक वाढल्याने उठाव होण्याची शक्यता आहे.
सोमेश्वरनगर : कांद्याच्या निर्यातीवरील शुल्क हटविण्यास केंद्रसरकारने नको तितका विलंब केला. परिणामी निर्णय होऊनही कांद्याच्या बाजारावर काडीमात्र फरक पडला नाही. निर्णयाआधी पुणे व लोणंद बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर ८०० ते १७०० रूपये प्रतिक्विटंल होते ते आजही जैसे थे च आहेत. कांद्याची आवक वाढल्याच्या पार्श्वभूमीवर कांद्याला उठाव मात्र मिळणार आहे.

