काहीही झालं तरी शेतकरी कायदा रद्द होणार नाही : चंद्रकांत पाटील

No matter what happens farmers law will not be repealed Said Chandrakant Patil
No matter what happens farmers law will not be repealed Said Chandrakant Patil
Updated on

पुणे : ''काहीही झालं तरी कायदा रद्द होणार नाही, त्यात फक्त बदल केला जाईल, सरकारने सर्वसामान्य शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेऊन कायदा तयार केला आहे.'' अशा परखड शब्दात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून राज्यात आंदोलन करणाऱ्यांना खडेबोल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुनावले. डॉ. बाबासाहेब आंबेडकारांना अभिवादन करण्यासाठी ते पुण्यात आले होते. दरम्यान, यावेळी पुणे स्टेशनजवळच्या आंबेडकर पुतळ्याजवळ अनुयायांची गर्दी झाली होती.  

केंद्राचे तीनही कृषी कायदे शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याने ते तिन्ही संपूर्ण रद्द करावेत, या मागणीवर ठाम असलेल्या शेतकरी संघटना एकवटल्या आहेत. मुख्यत: पंजाब आणि हरियाणा भागातले हे शेतकरी ऐन थंडीत दिल्लीत आंदोलन करत आहेत. आधी दिल्लीत प्रवेश करण्यापासून त्यांना रोखण्यासाठी सरकारने त्यांच्यावर पाण्याचा फवारा तसेच अश्रूधूराचाही वापर केला. मात्र, शेतकरी मागे हटले नाहीत. या आंदोलनात अनेक वयस्कर शेतकरी तसेच महिला आणि लहान मुले देखील सामिल झाली आहेत. यात काही जणांचा मृत्यू देखील झाला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

काहीही झालं तरी शेतकरी कायदा रद्द होणार नाही : चंद्रकांत पाटील
दरम्यान दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला फटकारले होते. केंद्र सरकारने दखल घ्यायला हवी होती पण घेतलेली दिसत नाही असे वक्तव्य केले होते.

शरद पवारांच्या वक्तव्याला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी, शेतकरी कायदा रद्द होणार नसल्याचं ठणकावून सांगितले. ''केंद्र सरकारने केलेल्या कायद्यात नवीन काही बदल केला नाही. जे जुन्या कायद्यात होतं तेचं आहे, फक्त आता या कायद्याने शेतकऱ्यांना मार्केटच्या बाहेर माल विकण्याची परवानगी मिळाली, जी आधी नव्हती. प्रश्न फक्त एमएसपीचा होता, केंद्र सरकार ऑन पेपर एमएसपीची रक्कम लिहून द्यायला तयार आहे. तरीही आम्ही आंदोलन करणार, भारत बंद करणार याला काही अर्थ नाही, केंद्र सरकारने केलेला कायदा रद्द होणार नाही ,फक्त कायद्यात बदल केला जाईल....। '' असे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिले.

निवडणूक हरलो तर, हिमालयात जाईल 
पदवीधर निवडणुकीत प्रचाराच्या निमित्ताने चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक हरलो तर, हिमालयात जाईल असे वक्तव्य केलेलं होते, मात्र निकाल जाहीर झाल्यानंतर पुन्हा याबाबत विचारले असता पाटील यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला.

शरद पवार यांच्यासह विरोधी पक्षातील नेते राष्ट्रपतींची घेणार भेट
देशात केलेल्या कृषी कायद्यावरून शरद पवार यांच्यासह विरोधी पक्षातील नेते भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. याबाबत चंद्रकांत पाटलांनी यांना विचारले असता त्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना भेटीसाठी शुभेच्छा दिल्या आणि ''लोकशाही आहे, लोकशाहीत कोणीही राष्ट्रपतींची भेट घेऊ शकतं.  ते भेट घेत असतील तर त्यांच स्वागत आहे'' अशी प्रतिक्रिया दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com