पुण्यात लॉकडॉऊनची गरज नाही : महापौर

mulidhar mohol
mulidhar mohol

पुणे : पुणे (pune)शहराबाबत मुंबई उच्च न्यायालयात(Mumbai High Court) कोरोनाबाधित रुग्णांची(Corobna Positive) संख्या जुनी सादर करण्यात आली असावी. पूर्वीसारखी परिस्थिती पुण्यात आता नाही. म्हणूनच या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीती निर्माण होऊ नये, या उद्देशाने मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ(Mayor Murlidhar Mohol) यांनी शुक्रवारी दिली. पुण्यात आणखी कडक लॉकडाउन(Lockdown) लावण्याची आवश्यकता नाही, असे मोहोळ यांनी सांगितले. (No need for lockdown in Pune sadi Mayor murlidhar mohol)

mulidhar mohol
अडचणीत सापडलेल्या नागरिकांना तरुणाईच्या उपक्रमाने मिळतोय आधार

पुणे शहरात १८ एप्रिल, २०२१ रोजी ॲक्टिव्ह कोरोनाबाधितांची संख्या ५६ हजार ०३६ इतकी होती, जी ६ मेपर्यंत ३९ हजार ५८२ पर्यंत खाली आली आहे. याचाच अर्थ ॲक्टिव्ह रुग्णसंख्येत तब्बल १७ हजार ०५४ इतकी घट झाली आहे', असेही ते म्हणाले.

पुणे शहरात कडक लॉकडाउन लावण्याच्या सूचना उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. त्या पार्श्वभूमीवर महापौर मोहोळ यांनी ही भूमिका मांडली आहे. पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची उच्च न्यायालयात जी आकडेवारी सादर करण्यात आली आहे, ती सध्याची असू शकत नाही. कारण गेल्या दोन आठवड्यात पुण्यातील परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. राज्य सरकारकडून सध्या आकडेवारीत घोळ सुरू आहे. त्यांच्याकडून जी आकडे जाहीर केली जात आहे. यामध्ये प्रचंड विसंगती दिसून येत आहे. मात्र मागील पंधरा दिवसात पुणे शहरात चांगली परिस्थिती पाहण्यास मिळत असून सक्रिय रुग्णांची संख्या जवळपास १६ हजारांनी कमी झाली आहे. तर मृत्यूदर देखील तुलनेने खाली आला आहे, असे मोहोळ म्हणाले.

पुणे शहरातील रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने, अनेक उपाययोजना केल्या जात आहे. मात्र, त्याच दरम्यान पुण्यात १ लाख आणि मुंबईत ५३ हजारांच्या आसपास रुग्णसंख्या असल्याचे पुढे आले आहे. ही आकडेवारी जिल्ह्याची असेल, असे मला वाटते. पुणे शहरात जवळपास ३९ हजार सक्रिय रुग्ण आहे. हीच संख्या १५ दिवसांपूर्वी ५५ हजारांच्या पुढे होती. ही संख्या निर्बंध आणि उपाययोजना यामुळेच आटोक्यात आली आहे. तर शहर, पिंपरी चिंचवड, ग्रामीण अशी मिळून लाखभर संख्या दाखविण्यात आली असावी, असेही महापौर म्हणाले.

mulidhar mohol
पुणे शहरात सक्रीय कोरोना रुग्णांची संख्येत होतेय घट

''पुणे शहराची परिस्थिती नियंत्रणात असून आता सर्व माहिती घेऊन मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले जाणार आहे. आम्ही न्यायालयात आमची बाजू मांडू. सध्या शहरात अत्यावश्यक सेवा सुरू आहे. यामुळे आणखी लॉकडाउन लावण्याची आवश्यकता नाही.''

- मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे

mulidhar mohol
पुणे : वारज्यात पोलीस उपनिरीक्षकाच्या आईचा खून

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com