पुणे शहरात सक्रीय कोरोना रुग्णांची संख्येत होतेय घट

हाॅस्पिटलमधील कोरोना रुग्ण आठ हजारांच्या आत : आज २४५१ नवे रूग्ण
corona update
corona updatecorona update
Updated on

पुणे(pune) : पुणे शहरातील(pune) एकूण सक्रीय कोरोना(corona) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. गुरूवारच्या (काल) तुलनेत शुक्रवारी (ता.७) शहरातील दिवसातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या ४५१ ने कमी झाली आहे. उपचारासाठी विविध रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची संख्याही आठ हजारांच्या आत आली आहे. आज २ हजार ४५१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. (The number of active corona patients is declining in Pune city)

corona update
सकाळ भूमिका : पुण्यात आणखी ‘कडक निर्बंध’ म्हणजे काय?

पुणे शहरात गुरुवारी (ता.६) २ हजार ९०४ नवे रुग्ण सापडले होते. तसेच काल शहरातील ८ हजार ३१६ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू होते. ही संख्या आज ७ हजार ९२३ झाली आहे. यामुळे एकाच दिवसात शहरातील विविध रुग्णांलयात ३९३ बेड (खाटा) रिकाम्या झाल्या आहेत. यामुळे शहरातील आजअखेरपर्यंतच्या एकूण सक्रीय रुग्णांची संख्या आता ३८ हजार ४८१ झाली आहे. यापैकी ७ हजार ९२३ रुग्णालयात उपचार घेत असून उर्वरित ३० हजार ५५८ गृहविलगीकरणात आहेत.

दरम्यान, पुणे जिल्ह्यात आज ९ हजार ३४ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. काल (गुरुवारी) हीच संख्या ९ हजार ६३५ होती. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी जिल्ह्यातील ६०१ रुग्ण कमी झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या आता १ लाख ५९० झाली आहे.

corona update
पुण्यात बहुरूपी, नंदीवाले आणि मरीआईवाल्यांना मिळाले रेशन; दानशूर मंडळींची मदत

शुक्रवारी दिवसभरात आढळून आलेल्या नवीन रुग्णांत पिंपरी-चिंचवडमध्ये २ हजार १०६, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ३ हजार ६९१, नगरपालिका हद्दीत ७१३ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात १०४ नवे रुग्ण सापडले आहेत.

आजच्या एकूण मृत्यूमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ६१, पिंपरी चिंचवडमधील ४३, ग्रामीण भागातील ३५ आणि नगरपालिका हद्दीतील पाच मृत्यू आहेत. आज कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

corona update
अडचणीत सापडलेल्या नागरिकांना तरुणाईच्या उपक्रमाने मिळतोय आधार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com