esakal | ''पुरंदर तालुक्यात अतिवृष्टीतील पंचनामे करण्यात हलगर्जी नको''
sakal

बोलून बातमी शोधा

 no negligence in conducting panchnama in Purandar taluka said Former Minister of State Shivtare

नुकसानीबाबत खातेनिहाय अहवाल तयार करून जिल्हा परिषदेकडे निधीची मागणी करावी, असेही शिवतारे यांनी सांगितले आहे. याबाबत तहसीलदार सरनौबत यांना पत्रही दिले.

''पुरंदर तालुक्यात अतिवृष्टीतील पंचनामे करण्यात हलगर्जी नको''

sakal_logo
By
- श्रीकृष्ण नेवसे

सासवड : ''पुरंदर तालुक्यात लागोपाठच्या पावसाने व अतिवृष्टीमुळे गावोगावी प्रचंड मोठे नुकसान झाले. या नुकसानीच्या पंचनाम्यांबाबत गावागावातून मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. अनेक गावात शासकीय कर्मचारी प्रत्यक्ष शेतात जात नसल्याचे समजते. काही गावांमधून पंचनामे करण्यास यंत्रणेतील कर्मचारी कंटाळा करत आहेत; असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पंचनामे करण्यात हलगर्जीपणा नको. एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी'', अशा सूचना माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी तहसीलदार रुपाली सरनोबत यांना दिल्या आहेत. 

शिवतारे यांच्या सूचनेनुसार पंचायत समितीच्या सभापती नलिनी लोळे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, ज्योती झेंडे, माजी सभापती अतुल म्हस्के, सदस्य दत्तात्रय काळे, अर्चना जाधव, गटविकास अधिकारी अमर माने व सर्व विभागप्रमुखांनी तालुक्यातील नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली.

होम क्वारंटाईन झाल्यानंतरही अजित पवारांचा कामाचा धडाका सुरूच

नुकसानीबाबत खातेनिहाय अहवाल तयार करून जिल्हा परिषदेकडे निधीची मागणी करावी, असेही शिवतारे यांनी सांगितले आहे. याबाबत तहसीलदार सरनौबत यांना पत्रही दिले. शिवतारे म्हणाले., पावसाचा मोठा तडाखा बसलेल्या हरणीसारख्या गावात केवळ पाच एकरचे पंचनामे केल्याचे समजले आहे. यंत्रणेने वेळेवर पंचनामे न केल्याने पिकांमधील पाणी आता ओसरले आहे. त्यामुळेही कर्मचारी पंचनामे करत नसल्याची शेतकरी वर्गातून तक्रार आहे. अशा सर्व तक्रारींची दखल घेत प्रत्यक्ष पंचनामे करावेत; अशा सूचना शिवतारे यांनी केल्या आहेत. 


शिवतारेंचे मुद्दे  :

नुकसान भरपाईचे पैसे कर्जात वळते करू नका. गेल्या वर्षी झालेल्या नुकसानीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेत. परंतु अनेक शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर वर्ग न करता ते कर्जखात्यात वळते करून घेतले जात आहेत. असा प्रकार न करणेबाबत शासनाचे स्पष्ट आदेश आहेत. त्यामुळे बँकांनाही याबाबत लिखित पत्राद्वारे स्पष्ट आदेश द्यावेत असेही शिवतारे यांनी तहसीलदार रुपाली सरनोबत यांना कळवले आहे.

बारामती : पोलिसांच्या ताण-तणाव व्यवस्थापनासाठी पोलिस अधीक्षक सरसावले!​

loading image