कांदा न खाल्ल्याने कोणीही मरत नाही : बच्चू कडू

No one dies without eating onions says Bacchu kadu
No one dies without eating onions says Bacchu kadu

मार्केट यार्ड (पुणे) : कांदा न खाल्ल्याने कोणी ही मरत नाही. कांदा दरवाढीमुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार असेल तर लोकांनी सहकार्य करायला हवे. जीवनावश्यक वस्तू अथवा कारखान्यात तयार होणाऱ्या वस्तुंचे भाव वाढले तर त्याविरोधात कोणी उभे राहताना दिसत नाही. दुसरीकडे शेतमालाचे भाव वाढले की सगळे चर्चा करना दिसतात, असे मत प्रहार संघटनेचे अध्यक्ष, आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

कांद्याच्या भावात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना फायदा होत आहे. त्यानिमित्त आमदार बच्चू कडू यांनी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा पुजन केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख, उपसचिव सतिश कोंडे, कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे, दि पुना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, आडते बापू भोसले, प्रहार संघटनेचे पुणे अध्यक्ष नयन पंडीत आदी यावेळी उपस्थित होते.

रोहित पवारांच्या पाठीवर झेडपीकडून कौतुकाची थाप

कडू म्हणाले, दोन महिन्यानंतर बाजारात नविन कांदा दाखल होईल. त्याबरोबर आयात केलेला कांदाही बाजारात असणार आहे. त्यावेळी कांदा इतका स्वस्त होईल की रस्त्यावर टाकून देण्याची वेळ येणार आहे. तोपर्यंत देश थांबायला तयार नाही, ही अवस्था वाईट असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. कांद्याचे भाव कमी झाले की, सरकार कांदा निर्यात करण्यासाठी पुढे येत नाही. मात्र, भाववाढ झाली की आयात करण्यात येते. वाढत्या भावाचा शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे. त्यातून चार आत्महत्या जरी थांबल्या तरी शेतकऱ्याचा फायदा होईल, असेही बच्चू कडू म्हणाले.

ही तर आणीबाणीची वेळ; न्यायव्यवस्थेत बदल झालाच पाहिजे 

कांदा दरवाढीची जास्त झळ बसत असेल तर प्रशासनाने स्वस्त धान्य दुकानातून कांदा विक्री सुरू करावी. अतिवृष्टीमुळे कांद्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कांद्याचा तुटवडा निर्माण झाला असून कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. दरवाढीमुळे शेतकऱ्यानं फायदा होत असल्याचेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com