ऑनलाइन व्यापाराचा परिणाम नाही

सकाळ कार्यालय, बुधवार पेठ - ‘सकाळ’ने आयोजित केलेल्या बैठकीस उपस्थित ‘पूना इलेक्‍ट्रॉनिक हायर पर्चेस असोसिएशन’चे सदस्य.
सकाळ कार्यालय, बुधवार पेठ - ‘सकाळ’ने आयोजित केलेल्या बैठकीस उपस्थित ‘पूना इलेक्‍ट्रॉनिक हायर पर्चेस असोसिएशन’चे सदस्य.

पुणे - ऑनलाइन व्यापारामुळे सध्या पारंपरिक पद्धतीतील व्यापाऱ्यांवर संकट कोसळले आहे. मात्र, घरगुती वापराच्या इलेक्‍ट्रॉनिक वस्तू प्रत्यक्ष पाहून विकत घेण्याच्या मानसिकतेमुळे या बाजारातील पारंपरिक व्यापारावर ऑनलाइनचा परिणाम झाला नसल्याचा व्यापाऱ्यांचा अनुभव आहे.

‘पूना इलेक्‍ट्रॉनिक हायर पर्चेस असोसिएशन’च्या सदस्यांची बैठक ‘सकाळ’ने आयोजित केली होती. त्यात या व्यापाऱ्यांनी आपले अनुभव मांडले. बैठकीस संघटनेचे अध्यक्ष मिठालाल जैन, श्‍याम खंडेलवाल, राजेश अग्रवाल, अशोक कोठारी, मुनीर शेख, भवरलाल परिहार, मुकुंद निम्हण, विक्की छाब्रा आणि व्यापारी महासंघाचे सचिव महेंद्र पितळिया उपस्थित होते.

पुणेकरांकडून सुमारे वीस ते बावीस प्रकारच्या मोठ्या इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंची खरेदी होते. त्यात दूरचित्रवाणी संच आणि वातानुकूलन यंत्रणा आदींची समावेश आहे. ऑनलाइन व्यापारामुळे पारंपरिक व्यवसायावर संकट आले असले, तरी मोठ्या इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंसाठी ग्राहक ऑनलाइनऐवजी प्रत्यक्ष दुकानात जाऊन वस्तू खरेदी करण्यास पसंती देत असल्याचे संघटनेच्या सदस्यांनी सांगितले. हे लोण मोठ्या वस्तूंपर्यंत भविष्यात पोचू शकेल. सध्या त्याचा धोका नाही असे ते म्हणाले.

रोखीच्या खरेदीकडे कल
हप्त्याने वस्तू खरेदी करता याव्यात, यासाठी दुकानदारांनीच स्वतः हप्तेबंदीची योजना काढली आणि त्यावरून संघटनेला हायर पर्चेस असोसिएशन असे नाव मिळाले. मात्र, नंतर शून्य व्याजदरात हप्तेबंदीची योजना राबविणाऱ्या कंपन्यांनी हा व्यवसाय मिळविला. सध्या मात्र रोखीने वस्तू विकत घेण्याचा कल वाढत चालल्याचे निरीक्षण व्यापाऱ्यांनी नोंदविले.

 संघटनेची स्थापना : १९४५
 संघटनेची सदस्यसंख्या : २२७
 पुणे, पिंपरी-चिंचवड येथील दुकानांची संख्या : ४५०
 दोन्ही शहरांतील वार्षिक उलाढाल  : १४०० कोटींपर्यंत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com