ई-बसला विरोध नाही ; पण आमच्या रोजगाराचे काय?

सिंहगडावर प्रवासी वाहतूक व पायथ्याला असलेल्या हॉटेल व्यावसायिकांचे आंदोलन
No opposition to Sinhagad e-bus employment agitation of hoteliers pune
No opposition to Sinhagad e-bus employment agitation of hoteliers pune sakal

खडकवासला : सिंहगडावर जाणाऱ्या इलेक्ट्रिक बसला आमचा विरोध नाही. पण यामुळे खासगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने, हॉटेल यासह पर्यटनाशी निगडित गावातील शेकडो तरुणांचा रोजगार जाणार आहे. त्याचा वन विभागाने काय विचार केला आहे. असा प्रश्न उपस्थित करीत आज सोमवारी दुपारी सिंहगडावर धरणे आंदोलन केले.

या आंदोलनात माऊली कोडीतकर, युवराज पायगुडे, अशोक लोहकरे, संदीप लोहकरे, विठ्ठल भरेकर, अनिकेत चव्हाण, मयुर लोहकरे, अक्षय भाडले, उपसरपंच गणेश गोफणे, शेखर चव्हाण, राजू चव्हाण, राहुल भाडले, सोमनाथ शिरोळे, अतुल भरेकर, बापूसाहेब दुधाणे, जालिंदर यादव, महबूब ककमरी, संतोष मंडले, अमर झरांडे उपस्थित होते.

आंदोलन करण्यापूर्वी स्थानिकांनी सिंहगडावरील प्रवासी वाहनचालक आणि स्थानिक हॉटेल व्यावसायिकांनी उपवनसंरक्षक राहुल पाटील यांना निवेदन दिले आहे. आतकरवाडी, थोपटेवाडी, सांबरेवाडी, मोरदरवाडी या चार गावांत वन व्यवस्थापन समित्या २००८ पासून कार्यरत आहेत. मात्र, या समित्यांना विश्वासात न घेता वनविभागाने सिंहगडवर इलेक्ट्रिक बस पीएमपीएमएल'च्या सेवा सुरू केली जाणार आहे.

गडावर जाणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी विविध चांगल्या उपक्रमास गावकऱ्यांचा विरोध नाही. पण स्थानिकांच्या वर्षानुवर्षे सुरू असलेल्या रोजगाराचा वन विभागाने विचार केलेला नाही. आम्ही गेली २० वर्षांपासून विविध व्यवसाय करीत आहे. आमच्या परिसरातील शेकडो कुटुंबाचा व्यवसाय हा पर्यटकांशी निगडित आहे. आमचा रोजगार यामुळे नष्ट होणार आहे. या विषयाकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्थानिकांच्या वतीने आंदोलन झाले.

डोणजे- गोळेवाडी ते सिंहगड अशी खासगी प्रवासी वाहतुक केली जाते. या व्यवसायात परिसरातील ५०हून अधिक तरुण आणि त्यांच्या कुटुंबाचा रोजगार यावर अवलंबून आहे. याआंदोलनात, गोळेवाडी, मोरदरी, कोंढणपूर, अवसरवाडी, डोणजे कल्याण या गावातील व्यावसायिक आहेत. तसेच, इलेक्ट्रिक बस ही डोणजे गावातील वाहनतळ येथून सुटणार आहे. त्यामुळे, पर्यटक तेथून थेट गडावर जाणार आहेत. यामुळे, गोळेवाडी, पोळेकरवाडी, आतकरवाडी येथील हॉटेल व्यावसायिकांवर परिणाम होणार आहे. याबाबतचा विचार वनविभागाने करावा.दरम्यान, सिंहगडवर इलेक्ट्रिक बससेवा कधी सुरू होणार, त्याचे दरपत्रक, पर्यटन शुल्क, बससेवा कशी असेल या सर्व प्रक्रियेत स्थानिकांना अंधारात ठेवले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com