संघर्षाशिवाय पर्याय नाही अन ओबीसीशिवाय सरकार नाही - कॅ. अजयसिंग यादव

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाच्या वतीने काँग्रेस भवनमध्ये शनिवारी (ता. १७) ओबीसी विभाग पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्यकर्ता मंथन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
captain ajay singh yadav
captain ajay singh yadavsakal
Summary

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाच्या वतीने काँग्रेस भवनमध्ये शनिवारी (ता. १७) ओबीसी विभाग पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्यकर्ता मंथन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

पुणे - भाजपकडे जनतेला सांगण्यासाठी कोणतेही मुद्दे नाहीत. महागाई, बेरोजगारी वाढत आहे. यापासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी देशातील सरकार आणि भाजप जातीजातीत आणि धर्माधर्मात विष पसरविण्याचे काम करत आहे. यापासून समाजाचे संरक्षण करावे लागणार आहे. समाजाचे रक्षण करण्यासाठी संघर्षाशिवाय पर्याय नाही. तसेच सत्ता काबीज करायची असेल तर ओबीसी शिवाय पर्याय नाही, असे मत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे प्रमुख कॅ. अजयसिंग यादव यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाच्या वतीने काँग्रेस भवनमध्ये शनिवारी (ता. १७) ओबीसी विभाग पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्यकर्ता मंथन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी पश्चिम महाराष्ट्रातील निवडक ३०० कार्यकर्त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यकर्त्यांना कॅ. अजयसिंग यादव यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले होते. प्रदेश काँग्रेसचे ओबीसी विभागाचे अध्यक्ष भानुदास माळी हे मेळाव्याचे संयोजक होते. माजी आमदार दिमी चौधरी स्वागताध्यक्ष होत्या. पश्चिम महाराष्ट्र ओबीसी विभागाचे अध्यक्ष डॉ. विवेक गुरव, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभाग उपाध्यक्ष साहिल केदारी, ओबीसी पुणे शहर अध्यक्ष प्रशांत सुरसे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र बरकडे, प्रदेश सरचिटणीस सुनील पंडित हे शिबिराचे निमंत्रक होते.

मेळाव्याला प्रदेश काँग्रेसच्या सहप्रभारी सोनल पटेल, अखिल भारतीय काँग्रेसच्या ओबीसीचे राष्ट्रीय समन्वयक राहुल यादव, आमदार संग्राम थोपटे, संजय जगताप, माजी मंत्री बाळासाहेब शिवकर, विश्वजीत कदम, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, मोहन जोशी, प्रदेश उपाध्यक्ष रमेश बागवे, आबा बागूल, कमल व्यवहारे, महिला अध्यक्ष पूजा आनंद, पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष कैलास कदम, प्रदेश सरचिटणीस नंदकुमार कुंभार, उपाध्यक्ष तुकाराम माळी, संगीता तिवारी आदी उपस्थित होते. चौधरी म्हणाल्या, ‘स्वराज्याचा आणि स्त्री शिक्षणाचा श्रीगणेशा ज्या पुण्यात झाला त्या पुण्यात हे शिबिर होत आहे, हे महत्त्वाचे आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारे आपण कार्यकर्ते असल्याने आपल्याला चिंतनाची गरज नाही. त्यामुळेच हे मंथन शिबिर असून ते परिवर्तनाची नांदी ठरेल.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com