esakal | बारामती येथे ऑक्सिजन व्हेंटीलेटर बेडचा तुटवडा
sakal

बोलून बातमी शोधा

covid19

बारामती येथे ऑक्सिजन व्हेंटीलेटर बेडचा तुटवडा

sakal_logo
By
मिलिंद संगई, बारामती

बारामती : कोरोनाची स्थिती बारामतीत बिकट होऊ लागली असून आज बारामतीत कोरोना रुग्णांना ऑक्सिजन व व्हेंटीलेटरचे बेडच उपलब्ध नाहीत, अशी स्थिती आली आहे. उपलब्ध शासकीय आकडेवारीवरुन आज बारामतीत रुग्णांना ना सरकारी ना खाजगी रुग्णालयात बेड उपलब्ध नव्हते. मिळालेल्या माहितीनुसार सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाची क्षमता 100 खाटांची आहे, आज तेथे 207 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यात ऑक्सिजनवर 98 तर व्हेंटीलेटरवर 15 रुग्ण आहेत. रुई रुग्णालयात 30 रुग्णक्षमता आहे तेथे 36 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. नर्सिंग महाविद्यालयाच्या वसतिगृहात 76 ऑक्सिजनचे बेड असून येथे 76 रुग्ण उपचार घेत आहेत. काल रात्री बारामतीत रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली होती, मात्र बेडसच उपलब्ध नाही, अशी स्थिती निर्माण झाली होती. नातेवाईकांची काल रात्रभर पळापळ सुरु होती, पण बेडच मिळाला नाही. एक रुग्ण तर अक्षरशः स्वता ची गादी, स्वताःची उशी आणि स्वताःची बेडशिट घेऊन आला होता, मला फक्त अँडमिट करुन घ्या, अशी याचना तो करत होता. अखेर त्यालाही रुग्णालयात दाखल करुन घेतले गेले.

हेही वाचा: आरोग्य सुविधांचे सर्व तालुक्यांना समन्यायी वाटप करा : विजय शिवतारे

बारामतीत सध्या दौंड, इंदापूर, फलटण, पुरंदर तालुक्यासह नगर, सातारा व सोलापूर जिल्ह्यातूनही रुग्ण येत असून आता तर पुण्यातूनही रुग्ण बारामतीत येऊ लागल्याचे चित्र आहे. या परिस्थितीमुळे बारामतीतील आरोग्य यंत्रणेवरील ताण कमालीचा वाढू लागला आहे. शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता आजपासून शहरातील आयुर्वेदीक होमिओपॅथिक 60 डॉक्टरांची सेवा अधिग्रहीत करण्याचा निर्णय उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी घेतला आहे.बारामती नगरपालिकेने आजपर्यंत बारामतीत तब्बल 509 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले असून कोरोना व सारी असे दोन्ही रुग्ण त्यात समाविष्ट असल्याचे आज सांगितले गेले. यात 324 मृत्यू बारामतीतील कोरोना व सारीच्या रुग्णांचे असून 185 मृत्यू इतर तालुक्यातील आहेत.

हेही वाचा: हवेली तालुक्यात कोरोनाचा कहर

दवाखान्यांच्या तपासण्या सुरु-दरम्यान आजपासून बारामतीत तहसिलदार विजय पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांच्यासह चार जणांचे पथक खाजगी कोरोना रुग्णालयांची तपासणी करणार आहे.

तीनशे ऑक्सिजनचे बेड पंधरवड्यात तयार होणार-दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार नवीन शासकीय रुग्णालयातील 150 ऑक्सिजनचे बेड आठवड्यात तर पुढील 150 ऑक्सिजनचे बेड पंधरवड्यात तयार होणार असून त्या नंतर बारामतीकरांची सोय होणार आहे.