esakal | हवेली तालुक्यात कोरोनाचा कहर
sakal

बोलून बातमी शोधा

covid19

हवेली तालुक्यात कोरोनाचा कहर

sakal_logo
By
जनार्दन दांडगे, उरुळी कांचन

लोणी काळभोर (पुणे) : आईला कसेतरी होते आहे, कृपा करुन एक ऑक्सिजनचे बेड कसेही मिळवून द्या...चुलते फार सिरीअस आहेत, काय पण करा व एक व्हेटीलेटरचे बेड उपलब्ध करा...मामाची ऑक्सिजन लेवल फार खाली आली आहे, एखादे बेड मिळवून द्या...वडील फार सिरीअस आहेत एक तरी रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवून या आशयाचे फोन रोज पहाटेपासून रात्री दोन वाजेपर्यंत खासदार, आमदार, जिल्हा परीषद सदस्य ते अगदी ग्रामपंचायत पातळीवरील लोकप्रतिनिधींचे खणाणत आहेत.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यातील न्यायालयीन कामकाजाच्या वेळा बदलल्या

पुर्व हवेलीमधील कोरोना बाधितांची वाढती संख्या व त्याप्रमाणात पुर्व हवेलीमधील विविध रुग्णालयात व्हेटीलेटर, ऑक्शिजन बेड व साध्या बेडसह इतर पायाभुत सुविधा उपलब्ध नसल्याने, रुग्णालये खासदा-आमदारांच्या फोनलाही वाटाण्याच्या अक्षदा लावत असल्याचे चित्र मागील आठ दिवसांपासून दिसून येत आहे. मात्र कोरोनाबाधित रुग्णांना सेवा पुरविण्याबाबतीत रुग्णालयांना येत असलेल्या अडचणी डोळ्यासमोर दिसत असल्याने खासदार, आमदार व स्थानिक लोकप्रतिनिधींनी कोरोनासमोर गुडघे टेकल्याचे चित्र पुर्व हवेलीत दिसून येत आहे.

हेही वाचा: जुन्नर : वैरणीला आग लागल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान

उरुळी कांचन, लोणी काळभोर, कदमवाकवस्तीसह पुर्व हवेलीत मागील पंधरा दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण अपेक्षे पेक्षाही मोठ्या प्रमाणात वाढल्याने, आरोग्य विभागाचे नियोजन पुर्णपणे विस्कळीत झाले आहे. कोरोनाची दुसरी लाट अत्यंत भयानक असून, मागील दहा दिवसांपासून या लाटेचा अंदाच रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक व स्थानिक लेकप्रतिनीधी अशा सर्वांनाच येऊ लागला आहे. कोरोना बाधीत नागरीक कोरोंनाशी संघर्ष करताना दिसून येत आहेत. तर कोरोना बाधीत रुग्णांचे नातेवाईक बेड, व्हेटीलेचर, रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळवण्यासाठी जिवाच्या आकांताने रात्रंदिवस प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहेत.