esakal | गेल्या तीन महिन्यात एकदाही इंधन दरात कपात नाही
sakal

बोलून बातमी शोधा

Fuel

गेल्या तीन महिन्यात एकदाही इंधन दरात कपात नाही

sakal_logo
By
सनील गाडेकर

पुणे - आंतरराष्ट्रीय दरांशी ताळमेळ घालता यावा, अचानक जास्त किंमत वाढल्यास त्याचा ग्राहकांना फटका बसू नये म्हणून जून २०१७ पासून इंधनाचे दर (Fuel Rate) दररोज बदलण्यास सुरू झाली. मात्र आता हा निर्णय वाहनचालकांसाठी जाचक ठरत आहे. कारण गेल्या तीन महिन्यात पेट्रोल-डिझेलचे (Petrol Diesel) दर एकदाही कमी झालेले नाहीत. (No Reduction in Fuel Prices in the Last Three Months)

गेल्या वर्षी अनलॉकनंतर इंधनाचे दर सातत्याने वाढण्यास सुरवात झाली होती. त्यानंतर सप्टेंबर २०२० मध्ये दर काहीसे कमी झाले. डिसेंबर २०२० पर्यंत दर कमी जास्त होत होते. मात्र जानेवारीनंतर पेट्रोल-डिझेलच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या. सरासरी पाच पैशांपासून ४० पैशांपर्यंत दरवाढ होत आहे. त्यामुळे १५ एप्रिलपासून १० जुलैपर्यंत पेट्रोल ९६.४५ रुपयांवरून १०६. ५५ वर तर डिझेल ७८.९७ वरून ९५.६१ रुपये प्रतिलिटरवर पोचले आहे.

हेही वाचा: एशियातील सर्वात मोठी 'नैसर्गिक ग्रीन वॉल’ पुण्यात

सहा महिन्यांत पेट्रोल १४.८८ तर डिझेल १५.९१ रुपयांनी महागले :

जानेवारीच्या सुरवातीला पेट्रोल ९० तर डिझेल ७८.९७ रुपये प्रतिलिटर होते. त्यानंतर १ जानेवारी ते ३० जून या सहा महिन्यांत पेट्रोल १४.८८ तर डिझेल १५.९१ रुपयांनी महागले आहे. या सहा महिन्यांत केवळ पाच वेळा इंधनाचे दर कमी झाले आहेत. २४ मार्च ते १५ एप्रिल दरम्यान दरात कपात झाली आहे. या काळात साधे पेट्रोल ५७, पॉवर पेट्रोल ५७ आणि डिझेल ५९ पैशांनी कमी झाले होते.

दरमहा इंधनाचे दर :

१ जानेवारी

पेट्रोल - ९०

डिझेल - ७८.९७

सीएनजी - ५५.५०

१ फेब्रुवारी

पेट्रोल - ९२.५२

डिझेल - ८१.७२

सीएनजी - ५५.५०

१ मार्च

पेट्रोल - ९७.१९

पॉवर पेट्रोल - १००.८७

डिझेल - ८६.८८

सीएनजी - ५५.५०

१ एप्रिल

पेट्रोल - ९६.६०

पॉवर पेट्रोल - १००.२९

डिझेल - ८६.२६

सीएनजी - ५५.५०

१ मे

पेट्रोल - ९६.६२

पॉवर पेट्रोल - १००.३०

डिझेल - ८६.३२

सीएनजी - ५५.५०

१ जून

पेट्रोल - १००.४०

पॉवर पेट्रोल - १०४.०८

डिझेल - ९०.९५

सीएनजी - ५५.५०

१ जूलै

पेट्रोल - १०४.८८

पॉवर पेट्रोल - १०८.५६

डिझेल - ९४.८८

सीएनजी - ५६.६०

१० जूलै

पेट्रोल - १०६.५५

पॉवर पेट्रोल - ११०.२४

डिझेल - ९५.६१

सीएनजी - ५६.६०

loading image