DSK यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डीएसके) यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी यांनी जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे
DSK यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
DSK यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळलाsakal media

पुणे : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डीएसके) यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी यांनी जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. सत्र न्यायाधीश जयंत राजे यांच्या न्यायालयाने हा अर्ज फेटाळला.

DSK यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
बंदच्या हिंसक वळणाची जबाबादारी घेता का? रझा अकादमीने दिलं उत्तर

३२ हजारहून अधिक ठेवीदारांची हजारो कोटींची फसवणूक केल्याप्रकरणात डीएसके यांच्यासह त्यांची पत्नी हेमंती, मुलगा शिरीष, बंधू मकरंद कुलकर्णी, पुतणी, जावई यांच्यासह इतरांना २०१९ साली अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर एमपीआयडी, फसवणूकसह विविध कलमानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. हेमंती कुलकर्णी आणि मकरंद कुलकर्णी यांच्यासह काहींना या प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला आहे.

DSK यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
ST Strike : सरकारची विरोधकांशी चर्चा; तोडग्याची शक्यता!

तर डीएसके दांपत्यांचा जामीन नाकारण्यात आला होता. त्यांनतर शिरीष कुलकर्णी यांनी त्याचे वकील आशिष पाटणकर आणि ॲड. प्रतीक राजोपाध्ये यांच्यामार्फत जुलै महिन्यात जामिनाचा अर्ज दाखल केला होता. त्यास विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी विरोध केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com