छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी शिवशाहीपासून बस वंचित 

No Shivsahi bus is available from Junnar taluka
No Shivsahi bus is available from Junnar taluka

मंचर : राज्य परिवहन महामंडळाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने शिवशाही बस सुरु केली. या बसेस पुणे, नाशिक, मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमध्ये राज्याच्या विविध भागातून ये-जा करतात. पण शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या जुन्नर तालुक्यातून एकही शिवशाही बस सोडली जात नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 

राज्य परिवहन महामंडळाने उत्पनवाढीच्या दृष्टीने शिवनेरी, हिरकणी बससेवा सुरु केली. शिवनेरी पाठोपाठ गेल्या वर्षापासून सुरु केलेल्या शिवशाही बससेवा प्रवाश्यांच्या पसंतीला उतरली आहे. वातानुकुलीत बस असल्याने उद्योजक, व्यापारी, अधिकारी वर्गांचा शिवशाहीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुणे विभागातून जवळपास 100 हून अधिक शिवशाही बस रस्त्यावर धावत आहेत. पण अनेकदा मागणी करूनही जुन्नर ते मुंबई व जुन्नर ते पुणे शिवशाही बस सुरु करण्यास राज्य परिवहन महामंडळ अधिकारी वर्गाकडून उदासीनता असल्याचे दिसून येते. पुणे नाशिक रस्त्यावरून जवळपास 64 शिवशाही बस ये-जा करतात पण एकही शिवशाही बस नारायणगाव, मंचर व राजगुरुनगर येथे थांबत नाही. त्यामुळे शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ परिसर असलेल्या जुन्नर, आंबेगाव व खेड हे तीन तालुके शिवशाही बससेवेपासून वंचित आहेत. 

जुन्नर व मंचर येथून पुणे, मुंबई शिवशाही बससेवा सुरु करावी. या भागातून पुणे-मुंबईला ये-जा करणाऱ्या प्रवाश्यांची संख्या मोठी आहे. शिवशाही बस सेवेच्या उत्पनाच्या दृष्टीने हा परिसर फायदेशीर ठरेल. राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी वेळकाढूपणा न करता शिवशाही बससेवा आंबेगाव व जुन्नर तालुक्यात सुरु करावी, अशी मागणी व्यापारी वर्गातून केली जात आहे. 

शिवशाही बससेवा मागणीच्या पाठपुराव्यासाठी रविवारी (ता. 2) मंचर येथे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील व खासदार डॉ अमोल कोल्हे यांना व्यापाऱ्यांचे शिष्ठमंडळ भेटणार आहे, अशी माहिती आंबेगाव तालुका व्यापारी असोशियशनचे प्रतिनिधी अजय घुले यांनी दिली.   
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com