पोलिस शिपाई भरती अर्जासाठी मुदतवाढ नाही

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 मार्च 2017

पुणे - ‘पोलिस शिपाई भरती-२०१७’ साठी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात येत असून, १७ मार्च ही शेवटची तारीख असेल. त्यानंतर मुदतवाढ मिळणार नाही, असे पोलिस उपायुक्‍त अरविंद चावरिया यांनी सांगितले. 

पुणे - ‘पोलिस शिपाई भरती-२०१७’ साठी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात येत असून, १७ मार्च ही शेवटची तारीख असेल. त्यानंतर मुदतवाढ मिळणार नाही, असे पोलिस उपायुक्‍त अरविंद चावरिया यांनी सांगितले. 

पोलिस भरतीसाठी mahapolice.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरता येतील. क्रिमिलेयरचे तत्त्व लागू करण्यात आलेल्या मागासवर्ग प्रवर्गातील उमेदवारांना जाती प्रमाणपत्र आणि उन्नत प्रवर्गात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र अशी दोन्ही प्रमाणपत्रे असतील तरच आरक्षणाचा लाभ मिळेल. अन्यथा संबंधित उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील उमेदवार म्हणून अर्ज भरता येईल. त्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या वयोमर्यादेच्या अटी लागू राहतील. शारीरिक आणि लेखी चाचणीमधील प्राप्त गुण एकत्रित करून गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. लेखी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर शक्‍यतो २४ तासांत अथवा उमेदवार संख्या जास्त असल्यास लवकरात लवकर भरतीचा अंतिम निकाल सूचना फलकावर आणि संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

अर्ज भरण्यासाठी अडचण आल्यास संपर्क - मो.९०१५९७८९७८
अतिरिक्‍त पोलिस महासंचालक (प्रशिक्षण) 
दूरध्वनी ०२२- २२०२३६३७

ऑनलाइन अर्ज भरताना आवश्‍यक सर्व कागदपत्रे सोबत हाताशी ठेवावीत. लेखी परीक्षेनंतरच उत्तीर्ण उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल. शाळा सोडल्याचा मूळ दाखला बंधनकारक राहणार नाही. 
- अरविंद चावरिया, पोलिस उपायुक्‍त (प्रशासन)

Web Title: no time period increase police recruitment form