esakal | पुण्यात लसीकरणाचीच टाळेबंदी; सलग चार दिवस बंद असल्याने नागरिक हवालदिल
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात लसीकरणाचीच टाळेबंदी; सलग चार दिवस बंद असल्याने नागरिक हवालदिल

पुण्यात लसीकरणाचीच टाळेबंदी; सलग चार दिवस बंद असल्याने नागरिक हवालदिल

sakal_logo
By
​ ब्रिजमोहन पाटील

पुणे : शासनाकडून लस उपलब्ध झालेली नसल्याने मंगळवारी (ता. ४) ४५ ते पुढील वयोगटासाठी लसीकरण होणार नसल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सलग चौथ्या दिवशी केंद्र बंद राहणार असल्याने लसीकरणाचीच टाळेबंदी झाल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.

आरोग्य सेवक, फ्रंट लाइन कर्मचारी, ४५ वयापुढील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. आत्तापर्यंत पहिला व दुसरा डोस मिळून ८ लाख ३८ हजार लसीकरण झाले आहे. त्यापैकी सुमारे ५ लाख नागरिक दुसऱ्या डोससाठी अपेक्षीत आहेत. ज्यांनी पहिला डोस घेऊन आता दुसरा डोस घेणे आवश्‍यक आहे अशांना प्राधान्य दिले जाईल असे महापालिकेने स्पष्ट केले होते. मात्र, गेल्या आठवड्याभरापासून पुरेशा प्रमाणात लसच उपलब्ध न झाल्याने दुसऱ्या डोस घेणे आवश्यक असणाऱ्यांची संख्या वाढत आहे. एका बाजूला दुसऱ्या डोसची प्रतिक्षा करणारे नागरिक आणि दुसरीकडे १८ वर्षांपुढील नागरिक अशी डोस डोस आवश्‍यक असणाऱ्यांची संख्या वाढत असताना

हेही वाचा: जावयाने सासूसोबतच मांडला संसार; बिनसल्यावर उचललं टोकाचं पाऊल

लस मात्र, मिळत नसल्याने एकूण गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. तुटवडा निर्माण होत असल्याने नागरिकांमध्ये लस मिळणार की नाही याबाबत चिंता निर्माण होत आहे. सोमवारी शासनाकडून पालिकेला लस उपलब्ध होईल अशी अपेक्षा होती. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू केला. पण त्यांना लस मिळणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे मंगळवारी शहरातील ४५ ते पुढील वयोगटासाठीचे लसीकरण बंद असणार असल्याचे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

आम्हाला फोन ही करू नका

लसीकरण वेगात करण्यासाठी नागरिक, नगरसेवकांचा महापालिका प्रशासनावर प्रचंड दबाव येत आहे. त्यामुळे पालिकेचे अधिकारी शासनाच्या आरोग्य विभागाच्या संपर्कात आहे. लस कधी मिळणार? आज किती डोस पाठविणार अशी चौकशी पालिकेचे अधिकारी करत आहेत. मात्र, आम्हाला लस कधी येईल म्हणून सतत विचारणा करून नका? फोन देखील करू नका. जेव्हा येईल तेव्हा आम्ही संपर्क साधू असे उत्तरे मिळत असल्याने पालिकाही हतबल झाली आहे.

पुण्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

loading image