पिंपळे सौदागर, रहाटणीसह पिंपरी, सांगवी पाण्याविना

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

पिंपरी गावातील नवीन उंच टाकीला जलवाहिन्या जोडण्याचे (इनलेट कनेक्‍शन) गुरुवारी (ता. १४) सकाळपासून सुरू केलेले काम शुक्रवारी (ता. १५) दुपारी बारा वाजता संपले. त्यामुळे गावठाणासह कॅम्प, पिंपळे सौदागर, रहाटणी, पिंपळे गुरव, कासारवाडी, सांगवी, दापोडी भागात शुक्रवारी सायंकाळचाही पाणीपुरवठा पुरेशा प्रमाणात होऊ शकला नाही. शनिवारी (ता. १६) सकाळचा पाणीपुरवठाही कमी दाबाने होण्याची शक्‍यता आहे.

पिंपरी - पिंपरी गावातील नवीन उंच टाकीला जलवाहिन्या जोडण्याचे (इनलेट कनेक्‍शन) गुरुवारी (ता. १४) सकाळपासून सुरू केलेले काम शुक्रवारी (ता. १५) दुपारी बारा वाजता संपले. त्यामुळे गावठाणासह कॅम्प, पिंपळे सौदागर, रहाटणी, पिंपळे गुरव, कासारवाडी, सांगवी, दापोडी भागात शुक्रवारी सायंकाळचाही पाणीपुरवठा पुरेशा प्रमाणात होऊ शकला नाही. शनिवारी (ता. १६) सकाळचा पाणीपुरवठाही कमी दाबाने होण्याची शक्‍यता आहे. 

रावेत अशुद्ध जलउपसा केंद्र, निगडी जलशुद्धीकरण केंद्र व पाणीवितरण व्यवस्थेतील दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी शहरातील सायंकाळचा पाणीपुरवठा बंद ठेवला होता. शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याची शक्‍यता होती. मात्र, पिंपरी गावात बांधलेल्या नवीन टाकीला जलवाहिनी जोडण्याचे काम शुक्रवारी दुपारपर्यंत सुरू होते. त्यामुळे भाटनगर, पिंपरी, पिंपळे सौदागर गावठाण टाकीवरील भाग, रहाटणी गावठाण, पिंपळे गुरव, कासारवाडी गेटखालचा भाग, सांगवी या भागात गुरुवारी सायंकाळी व शुक्रवारी सकाळचाही पाणीपुरवठा झालेला नव्हता. पिंपरी गावातील टाकीला जलवाहिनी जोडण्याचे काम शुक्रवारी पूर्ण झाले. शनिवारी (ता. १६) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने व अनियमित होण्याची शक्‍यता आहे, असे कार्यकारी अभियंता रामदास तांबे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no water in pimple saudagar rahatani pimpri sangavi