दुरुस्तीच्या कामामुळे शहरात गुरुवारी पाणीपुरवठा नाही 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

पुणे - महापालिकेच्या विविध जलकेंद्र आणि पंपिंग स्टेशन येथे देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार असल्याने गुरुवारी (ता. 10) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारी कमी दाबाने आणि उशिरा पाणीपुरवठा होईल, असे महापालिकेने कळविले आहे. 

पर्वती जलकेंद्र येथील पंपिंग स्टेशन, रॉ वॉटर पंपिंग स्टेशन, वडगाव जलकेंद्र, लष्कर जलकेंद्र, एसएनडीटी जलकेंद्र, वारजे जलकेंद्र, नवीन होळकर पंपिंग स्टेशन येथे देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. यामुळे गुरुवारी संपर्णू शहराचा पाणीपुरवठा बंद राहील, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे. शुक्रवारी (ता. 11) संपूर्ण शहराला उशिरा आणि कमी दाबाने पुरवठा होणार असून, नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे. 

Web Title: no water supply in the city due to the repair work

टॅग्स