पुणे : गांधी पुण्यतिथी दिवशी सीएएविरोधात अहिंसात्मक जनआंदोलन 'या विषयावर सभा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 जानेवारी 2020

  • 'सीएए, एनआरसी, एनपीआर विरोधी अहिंसात्मक जनआंदोलन ' या विषयावर 30 जानेवारी रोजी सभा
  • गांधी पुण्यतिथी दिवशी गांधी भवन, कोथरूड, पुणे येथे होणार जाहीर सभा
  • बिशप डाबरे, उर्मिला मातोंडकर , तिस्ता सेटलवाड, डॉ. कुमार सप्तर्षी यांची प्रमुख उपस्थिती

पुणे : 'सीएए, एनआरसी, एनपीआर विरोधी अहिंसात्मक जनआंदोलन ' या विषयावर महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे ३० जानेवारी २०२० रोजी महात्मा गांधी पुण्यतिथी आणि हुतात्मा दिनानिमित गांधी भवन, कोथरूड येथे  जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. बिशप थॉमस डाबरे,अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड  यांच्या प्रमुख उपस्थितीत ही जाहीर सभा होणार असून अध्यक्षस्थानी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी असणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

३० जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ६ वाजता ही जाहीर सभा गांधी भवन , कोथरुड येथे होणार आहे. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या शांती दलाचे कार्यवाह संदीप बर्वे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. '३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधी यांची हत्या झाली होती. सद्यस्थितीत त्यांच्या विचारांचे स्मरण करणे, हा या सभेचा हेतू आहे. नागरीक नोंदणी रजिस्टर ( एनआरसी ), सीएए, एनपीआर वरून निर्माण झालेली  देशातील अस्थिर परिस्थिती सामान्य होण्यासाठी महात्मा गांधींच्या विचारांचा आश्रय घेणे हा एकमेव मार्ग आहे. या विचारातून आपण समस्तांनी गांधींजींचे स्मरण करणे आवश्यक आहे, म्हणून गांधी विचार प्रेमी समस्त नागरिकांना निमंत्रित करण्यात येत आहे', असे डॉ.कुमार सप्तर्षी यांनी या पत्रकात म्हटले आहे.

देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक झालेला शेरजिल आहे तरी कोण?

महात्मा गांधी पुण्यतिथी दिवशी दरवर्षीप्रमाणे गांधी भवन येथे सकाळी साडेआठ ते साडेनऊ या वेळेत गांधी आश्रमातील प्रार्थना होईल. सायंकाळी साडेचार वाजता मिनी थिएटरमध्ये ' ३० जानेवारी १९४८ ' हा माहिती पट दाखवला जाईल. ५ वाजून १८ मिनिटांनी महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल. दिवसभर महात्मा गांधी यांच्यावरील पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध असतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Non violent Movement against CAA on Gandhis death anniversary in Pune