पंतप्रधान होण्याचे स्वप्नच नाही - स्मृती इराणी

पंतप्रधान होण्याचे स्वप्नच नाही - स्मृती इराणी

पुणे - स्मृती इराणी पंतप्रधान कधी होणार?... उत्तर आले कधीच नाही! दस्तुरखुद्द वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनीच हे उत्तर दिले. ‘‘पंतप्रधान होण्याचे माझे स्वप्नच नाही. नरेंद्र मोदी यांच्यासारख्या करिष्मा असलेल्या नेतृत्वाबरोबर काम करायला आवडेल,’’ अशी स्पष्टोक्तीदेखील त्यांनी केली.

‘वर्डस काउंट’ या शब्दोत्सवात त्यांची मुलाखत झाली. महिला आरक्षण विधेयकावर तुमचे मत काय, तसेच आरक्षणाला पाठिंबा असेल, तर निवडणुकीत भाजप ३३ टक्के महिलांना तिकीट देणार का, या प्रश्‍नावर त्या म्हणाल्या, ‘‘महिलांना आरक्षण मिळाले पाहिजे, हे विधेयक संमत होईल, याबाबत आशावादी आहे.’’ 

सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांचीही मुलाखत झाली. लंडनमध्ये नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली. यामुळे तुम्हाला मोदीभक्‍त म्हटले जाते. या प्रश्‍नावर, ‘‘मग लंडनमध्ये  जाऊन माझ्या देशाची मी बदनामी करायला हवी होती का? जे देशासाठी चांगले, तेच माझ्यासाठी चांगले,’’ असे उत्तर त्यांनी दिले.  

प्रियांका गांधी?... नव्हे; मिसेस वद्रा!
प्रियांका गांधींबाबत विचारल्यावर त्यांचा ‘मिसेस वद्रा’ असा जोरकस उल्लेख करीत इराणी म्हणाल्या, ‘‘आपल्याकडे लोकशाही व्यवस्था असल्याने वद्रा यांचे राजकारणात येणे अपेक्षित आहे.’’ अमेठीतून लोकसभेची निवडणूक लढविणार का, या प्रश्‍नावर त्यांनी पक्षप्रमुखांचा संदर्भ देत हा निर्णय अमित शहा घेतील, असे स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com