विद्यार्थ्यांनो, स्पर्धा परीक्षेचे वास्तव तुम्हाला माहिती आहे का?

exam.jpg
exam.jpg

स्वारगेट (पुणे) :  जे विद्यार्थी यशस्वी होतात त्यांचे ठिकठिकाणी सत्कार होतात. त्यांची यशोगाथा ही सामान्य लोकांना समाज माध्यमातून किंवा भाषणातून समजते आणि त्याचा परिणाम विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांवर होतो . मग त्यांना वेध लागतात अधिकारी होण्याचे पण त्यांना सगळ्यांना फक्त यशस्वी मुलंच दिसतात. त्यांना अपयशी लोकच माहित नसतात. स्पर्धा परीक्षेमधली खरी वास्तविकता अधिकाऱ्यांनो तुम्हीच सांगा अशी विनंती स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांनी निवड झालेल्या अधिकाऱ्यांना केली आहे.


स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्याचं नेमकं प्रमाण किती?महत्त्वाचे पाहिले तर दरवर्षी दोन परीक्षा नियमित होतात. एक म्हणजे राज्यसेवा (जागा 300 ते 400) आणि दुसरी संयुक्त परीक्षा वर्ग दोनची परीक्षा (जागा 700 ते 800) या दोन्हीसाठी जर जागा चांगल्या असतील तर 1200 ते 1300 जागा दरवर्षी येतात आणि फॉर्म येतात जवळपास 4 लाखाच्या आसपास आणि 10 वर्षात एकूण किती पदे भरली जातील तर 12 हजार ते 13 हजार. म्हणजे 10 वर्ष जरी सर्व मुले थांबली तरी उरलेले 3 लाख 80 हजार मुले अपयशीच होणार ना. बर या आकड्यांमध्ये दरवर्षी वाढच होत असते. कमी मात्र होत नाही. मग ही अपयशी झालेली मुले काय करत असतील कधीच कोणाला समजत नाही अन् कोणाला माहिती पण करून घ्यायच नसत. कारण लोक नेहमी उगवत्या सूर्यालाच नमस्कार करतात, अशी स्पर्धा परीक्षांमधील व्यथा सुजित पोकळे या विद्यार्थ्यांनी मांडली आहे.

 पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

काही वर्ष जोमाने अभ्यास केल्यानंतर वयाच्या तिसाव्या वर्षानंतर अनेक प्रश्न समोर उभे राहतात. एखाद्या दुसऱ्या क्षेत्राकडे पण लगेच वळता येत नाही. कारण तो त्या वयात खूप अस्थिर असतो. दुसऱ्या पण क्षेत्रात आपण अपयशी झालो तर काय. बाकीचे जे लोक आयुष्य जगत असतात तस त्याला काहीच आयुष्य जगता नाही येत  त्याच्या सेटलमेंटचा प्रश्न असतो, त्याच्या लग्नाचा प्रश्न, त्याच्या पोटापाण्याचा, त्याच्या घराचा प्रश्न असतो. त्याचबरोबर आयुष्यात 2 पैसे पण कधी कमवेल की नाही. याचा प्रश्न असतो.  अशा अपयशी लोकांकडे समाजातील काही लोक तुच्छपणे बघतात. सदाशिव पेठ सोडून त्यांना मोकळेपणाने जगता पण येत नाही असं आम्हाला वाटत आशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.

जे यशस्वी होऊन अधिकारी झाले आहेत. त्यांना सर्वांना एकच कळकळीची विनंती आहे. स्पर्धा परीक्षेची दुसरी बाजू पण नक्की सांगा. कारण तुमचं खूप लोक ऐकत असतात आणि तुमच्या बोलण्याचा परिणाम विद्यार्थी आणि पालकांवर मोठ्या प्रमाणात होतो .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com