मास्क न घातल्यामुळे कारवाई करणाऱ्या पोलिसाच्या पायावर पठ्ठ्यानं घातली दुचाकी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 17 October 2020

दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या तरुणांना मास्क न घातल्याची विचारणार करणाऱ्या वाहतूक पोलिसाच्या पायावर तरुणाने दुचाकी घातल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेनंतर पळून जाणाऱ्या दुचाकीस्वारासह त्याच्या साथीदाराला पोलिसांनी पकडले. या घटनेत पोलिस गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना शुक्रवारी सकाळी सव्वा अकरा वाजता शिवाजीनगर येथे घडली.

पुणे - दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या तरुणांना मास्क न घातल्याची विचारणार करणाऱ्या वाहतूक पोलिसाच्या पायावर तरुणाने दुचाकी घातल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेनंतर पळून जाणाऱ्या दुचाकीस्वारासह त्याच्या साथीदाराला पोलिसांनी पकडले. या घटनेत पोलिस गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना शुक्रवारी सकाळी सव्वा अकरा वाजता शिवाजीनगर येथे घडली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बालाजी बाबूराव पांढरे असे या घटनेत जखमी झालेल्या पोलिसाचे नाव आहे. तर सौरभ लहू उमरे (वय 20, मूळ रा. तेर, उस्मानाबाद), मयूर धनंजय चतुर (वय 26, दोघेही रा. सध्या रा.साईनगर, हिंगणे, मूळ रा.जामगाव, बार्शी, उस्मानाबाद) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पांढरे यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरामध्ये मास्क परिधान न करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.

NEET Result 2020: 'नीट'मध्ये महाराष्ट्राचा नंबर खालून दुसरा; काय आहेत कारणे?

 

त्यानुसार, शिवाजीनगर वाहतूक विभागामध्ये पोलिस शिपाई असलेले बालाजी पांढरे हे त्यांच्या सहकाऱ्यांसह शुक्रवारी सकाळी शिवाजीनगर येथील वीर चाफेकर पुलाजवळील सवाई गंधर्व स्मारकासमोर मास्क परिधान न करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करीत होते. त्यावेळी सौरभ उमरे व मयूर चतुर हे दोघेजण त्यांच्या दुचाकीवरून जात होते. त्यावेळी पांढरे यांनी त्यांना अडवून मास्क का घातला नाही, अशी विचारणा केली. तसेच त्यांनी मास्क न घातल्यामुळे त्यांच्यावर कारवाईची पावती करीत होते. तेव्हा, दुचाकीस्वारांना त्याचा राग आल्याने त्यांनी फिर्यादी पांढरे यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर गाडीने धक्के मारत फिर्यादी यांना खाली पाडले, त्यानंतर त्यांच्या डाव्या पायावर गाडी घालून दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शिवाजीनगर येथील चौकात थांबलेल्या वाहतूक पोलिसांनी त्यांची दुचाकी अडवून त्यांना ताब्यात घेतले. या घटनेत फिर्यादी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पुण्यात ऐन गर्दीच्या ठिकाणी थरार; शिवीगाळ केली म्हणून मित्रालाच चाकूने भोसकले

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: not wearing mask he put two wheeler on leg of the policeman taking action