शौर्याची गाथा वहिच्या मुखपृष्ठावर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

पिंपरी - देशाचे संरक्षण करताना सीमेवर दरवर्षी महाराष्ट्रातील अनेक जवान शहीद होतात. देशासाठी त्यांनी केलेल्या कार्याची माहिती शालेय विद्यार्थ्यांना व्हावी, यासाठी एसकेएफ कंपनीतील कर्मचाऱ्यांनी शालेय वह्यांच्या मुखपृष्ठावर शहीद जवानांचे छायाचित्र छापून त्या विद्यार्थ्यांना दिल्या. गेल्या तीन वर्षांपासून ते हा उपक्रम करत आहेत. 

मुखपृष्ठावर शहीद जवानांचे छायाचित्र व मलपृष्ठावर त्याची माहिती देण्यात आली आहे. त्याला राज्य सरकारच्या सैनिक कल्याण विभागाची मान्यता मिळाली आहे. मागील वर्षी उरी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांची माहिती व छायाचित्र असलेली, तर त्याच्या पूर्वी सीमेवर शहीद झालेले संतोष महाडीक, कुंडलिक माने यांच्यावरील वह्या काढण्यात आल्या होत्या. 

यंदा शहीद झालेले महाराष्ट्रातील कॅप्टन नायक प्रेमकुमार पाटील, नायक सोमनाथ खैरे, कॉन्स्टेबल नंदकुमार अत्राम, नायक योगेश धामणे, शिपाई गणेश ढवळे, बालाजी अंबोरे, महादेव तुपारे, सावन माने, संदीप जाधव, आनंद गवई, दीपक घाडगे, संजू खंडारे, रामचंद्र माने, विकास समुद्रे, प्रेमदास मेंढे, रवींद्र धनावडे, मंगेश बालपाणडे, प्रवीण येलकर, मधुकर म्हस्के, सुमेध गवई या २० जवानांची माहिती दिली आहे. 

जवानांच्या कार्याची शालेय विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, म्हणून हा उपक्रम सुरू केल्याचे परिवाराचे सदस्य राजेंद्र जगदाळे यांनी सांगितले. परिवाराचे सदस्य दरवर्षी शहीद जवानांच्या परिवाराला भेट देऊन त्यांची माहिती, फोटो जमा करतात. त्यानंतर वह्या तयार करून घेतात आणि चापेकर स्मारक समितीच्या पुनरुत्थान समरसता गुरुकुलम, तळेगावमधील कुष्ठरोग मुलांची शाळा, या ठिकाणी त्यांचे वाटप करतात. उर्वरित वह्यांचे वाटप कर्मचाऱ्यांच्या मुलांना करण्यात येते. एका वहीसाठी ४५ रुपये खर्च येत असल्याचे जगदाळे यांनी सांगितले.

Web Title: note book cover page Bravery history