पुण्यात मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा; सरचिटणीस म्हणतात...

Notice to MNS workers in Pune
Notice to MNS workers in PuneNotice to MNS workers in Pune

पुणे : मनसे कार्यकर्त्यांनी मशिदींसमोर भोंगे लावून हनुमान चालिसा म्हणू नये म्हणून मुंबई पोलिसांनी सोमवारी मनसे (MNS) कार्यकर्त्यांना नोटीस बजावली होती. मंगळवारी पुण्यात मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा देणे सुरू केले आहे. दुसरीकडे औरंगाबादमधील सभेप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात मंगळवारी औरंगाबादमधील सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे विविध प्रश्न उपस्थित केले जात आहे. (Notice to MNS workers in Pune)

रविवारी औरंगाबादमध्ये झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी ४ मे रोजी मशिदींसमोर भोंगे लावून हनुमान चालिसा म्हणू असे खुले आव्हान दिले होते. मशिदीवरील भोंगे उतरवले नाही तर ४ मे रोजी काहीही ऐकणार नाही, असे राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले होते. यामुळे मुंबई पोलिसांची मनसे कार्यकर्त्यांना कलम १८८ अंतर्गत नोटीस (Notice) पाठवली होती.

Notice to MNS workers in Pune
प्रियकराचे कर्ज फेडण्यासाठी अभियंता प्रेयसी करायची चेन स्नॅचिंग

मंगळवारी औरंगाबादमधील सिटी चौक पोलिस ठाण्यात राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे मनसे (Notice) कार्यकर्ते चांगलेच नाराज झाले आहेत. अशात पुण्यात मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा देणे सुरू झाले आहेत. बुधवारी मशिदींसमोर भोंगे लावून हनुमान चालिसा म्हणू नका म्हणून कार्यकर्त्यांना नोटिसा देण्यात येत आहे. यामुळे बुधवारी महाआरती होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पोलिसांनी मनसेला (MNS) नोटिसा (Notice) दिल्या तरी महाआरती होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आदेश पाळण्यात येणार आहे. भोंग्यांबाबत पोलिस नीट काहीही सांगत नाही. माहाआरती होणारच. मनसैनिक घाबरणार नाही.
- हेमंत संभूस, सरचिटणीस, मनसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com