

Notorious Criminal Sagar Moholkar Dies During Treatment at Sassoon Hospital
esakal
पुणे : अहिल्यानगरच्या जामखेड येथे गोळीबारात गंभीर जखमी झालेला कुख्यात गुंड सागर मोहोळकर (वय २७) याचा ससून रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी मृत्यू झाला. त्याच्यावर जामखेड येथे ४ मार्च रोजी सायंकाळी गोळीबार झाला होता. त्याला पुढील उपचारासाठी ससूनमध्ये उपचारासाठी दाखल केले होते.