मस्तच! आता सर्व शाळांना मिळणार ई-लर्निंग प्लॅटफॉर्म', तेही फ्री; वाचा सविस्तर बातमी

Now All schools to get free E learning platform.png
Now All schools to get free E learning platform.png

पुणे : लॉकडाऊनमुळे तुमचा आणि विद्यार्थ्यांचा संपर्क तूटतोय का!, शिकविण्यासाठी काही अॅपचा वापर होतोयं; पण त्यालाही काही मर्यादा आहेत? म्हणून तुम्ही 'ई-लर्निंग' व्यासपीठाच्या शोधात असाल!! तर जरा इकडे लक्ष द्या. आता सर्व शाळांसाठी विनामूल्य लर्निंग प्लॅटफॉर्म उपलब्ध होऊ शकणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

होय, 'इम्पेल लर्निंग सॉल्युशन्स' या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीने देशातील कोरोना विरोधी लढ्यात खारीचा वाटा उचलत सर्व शाळांना विनामूल्य लर्निंग प्लॅटफॉर्म देण्याचे जाहीर केले आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक शाळा चांगल्या ई-लर्निंग व्यासपीठाच्या शोधात आहेत. या शाळांसाठी हा एक पर्याय असू शकतो.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वाकडेवाडी येथे ही कंपनी कार्यरत असून कंपनीच्यावतीने आजवर शिक्षण क्षेत्रात विविध कामे केली आहेत. मागील तीन वर्षात दहापेक्षा अधिक शाळांना ई-लर्निंगच्या माध्यमातून शिकण्याचे व्यासपीठ कंपनीने उपलब्ध करून दिले आहे. या व्यासपीठाद्वारे शाळांमधील शिक्षकांना विद्यार्थ्यांशी घर बसल्या संवाद साधणे शक्य होणार आहे. अभ्यासक्रमाशी संलग्न ध्वनिचित्रफीत आणि ई-लर्निंग धडे याद्वारे देता येतील. तसेच विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या परीक्षा घेणेही या व्यासपीठाद्वारे शक्य आहे. हे सॉफ्टवेअर विकसित करताना शाळांचा डेटाबेस सुरक्षित राहिल, याची देखील काळजी घेतली आहे. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलिंग देखील या व्यासपीठामुळे सोपे आणि सुरक्षित झाले आहे. 

Video : आठ बाय आठ फुटांच्या खोलीत, कसं पाळायचं डिस्टंसिंग?

कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या आपत्तीची जाणीव ठेवून सर्व शाळांना मोफत लर्निंग व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याचे कंपनीचे संस्थापक कमलेश कनगरे आणि आदिती पारखी यांनी सांगितले.  ई-लर्निंग सुविधेचा लाभ घेण्यासाठी कंपनीच्या www.Impellearning.com या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

ठरलं : पुण्यात विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com