Corona Virus : कोरोनामुळे होणार ऑनलाइन कॉन्सर्ट; आता कलाकारांना मिळणार वैश्विक संगीतमंच

Now artists will get global music platform through Online concert due to Corona
Now artists will get global music platform through Online concert due to Corona
Updated on

पुणे : कोरोनाच्या प्रभावानंतर जगातील सर्व क्षेत्रात उलथापालथ होईल, त्यात संगीत क्षेेत्रही कसे बाजूला राहील. या बदलामध्ये संगीतालाही ऑनलाइन कॉन्सर्टचे कोंदण मिळेल आणि कलाकारांना वैश्विक संगीतमंचाचे अवकाश खुले होईल...
बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
कोरोनानंतर संगीत क्षेत्राचे भवितव्य कसे असेल, या विषयी सकाळने गायक कलाकरांशी संवाद साधला. त्यात अनेकांनी ऑनलाइन अर्थात इंटरनेटच्या माध्यमातून संगीताचे नवे प्रवाह रसिकांभोवती फेर धरतील. हिंदुस्थानी शास्रीय-उपशास्रीय आणि सुगम संगीतही वैश्विक स्तरावर गुंजत राहील, अशी भावना या कलाकरांनी व्यक्त केली आहे.

 Coronavirus : कोरोनासाठी पुण्यात स्वतंत्र रूग्णालय; सरकारचा प्रस्ताव
गायिका अंजली मराठे म्हणतीत, "संगीत क्षेत्राला पूर्वपदावर यायला थोडा वेळ लागेल. यापुढे आर्थिक अडचणी वाढतील. पण संगीत ही गरज असेलच. सोशल मीडियामुळे संगीत क्षेत्राचे स्वरूप बदलत आहेच. या मीडियाचा अवाका खूप मोठा आहे. त्यामुळे आपण खूप जास्त लोकांपर्यंत पोचू शकतो.  कोरोना नंतरच्या काळात हीच पद्धत रुढ होऊ शकते. ऑनलाइव्ह लाइव्ह काँन्सर्टचे युगही प्रस्थापित होईल. लोक पैसे देऊन या अशा ऑनलाइन मैफलींचा आस्वाद घेऊ लागतील."


 खासदार, आमदारांच्या ॲम्ब्युलन्स ताब्यात घ्या ! 
शास्रीय गायक पं. यादवराज फड म्हणाले, "चित्रपटगृहातील पडदा टीव्हीच्या रुपाने आपल्या घरात कधी आला, हे समजलेही नाही. तसेच संगीताच्या मैफली या इंटरनेटद्वारे आपल्या घराचत होऊ लागतील. संगीतातील कलाकाराला वैश्विक होणे सोपे होईल. यातून कलाकारला आर्थिक लाभ किती होईल हे आताच सांगता येणार नाही. पण या क्षेत्रात खूप मोठे बदल होतील, यात शंका नाही."

शास्रीय गायिका सानिया पाटणकर यांनी, कोरोनामुळे ऑनलाईन कॉन्सर्टचा ट्रेंड येऊ लागला आहे. मनुष्य जीवन, आर्थिक सामाजिक सर्वच स्तरांवर बदल होणार तर संगीत क्षेत्रातही बदल होऊ शकतात. कोरोनानंतरच्या काळात काही मोठे संगीत महोत्सवही ऑनलाईन होऊ शकतील. कदाचित ऑनलाईन  ऐकणाऱ्या श्रोत्यांची संख्याही वाढू शकेल. आर्थिक गणिते बदलू शकतील. शास्त्रीय संगीताच्या मांडणीमध्ये, वेळेच्या बंधनात काही फरक होईल का हे मात्र काळच ठरवेल. अर्थात मैफलींमध्ये श्रोते आणि कलाकार यामध्ये जो प्रत्यक्ष सांगीतिक संवाद घडून नवनिर्मिती होते, ती होणार का असाही प्रश्न आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com