वीज ग्राहकांनो,आता घरबसल्या मांडा तक्रारी; महावितरणाने घेतला 'हा' महत्वाचा निर्णय 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता यांना विभाग व उपविभागस्तरावर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचे आयोजन करण्याचे आदेश दिले आहे. तसेच नाळे हे स्वतः पुणे, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील औद्योगिक व अतिमहत्वाच्या ग्राहकांशी संवाद साधणार आहे.

पुणे : पिंपरी-चिंचवड येथील वेबीनार यशस्वी झाल्यानंतर महावितरणनने ग्राहकांच्या तक्रारी निवारणासाठी आता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरीकांना आता वीजविषयक तक्रारी सोडण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात जाण्याची गरज नाही. घर बसल्या ते आपल्या तक्रारी मांडू शकणार आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या लॉकडाऊन सुरु असल्याने विविध तक्रार निवारणासाठी सर्व ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी वेबिनार किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचे आयोजन करण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणला दिले आहे. त्यामुळे महावितरण आता सर्व वर्गवारीतील ग्राहकांशी वेबीनार किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे थेट संवाद साधून वीजपुरवठा, वीजबिल, वीजयंत्रणेची दुरुस्ती आदींबाबत गाऱ्हाणी, प्रश्न, अपेक्षा व अडचणी जाणून घेऊन त्याचे निराकरण करणार आहे. तसेच ग्राहकांना महावितरणच्या विविध सेवांची माहिती उपलब्ध करून देणार आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता यांना विभाग व उपविभागस्तरावर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचे आयोजन करण्याचे आदेश दिले आहे. तसेच नाळे हे स्वतः पुणे, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील औद्योगिक व अतिमहत्वाच्या ग्राहकांशी संवाद साधणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या आयोजनाची तारीख व वेळेची पूर्वमाहिती संबंधीत स्थानिक कार्यालयाकडून वीजग्राहकांना कळविण्यात येणार आहे.याआधी पिंपरी-चिंचवड येथील 180 सोसायट्यांच्या फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांशी महावितरणने नुकताच वेबिनारद्वारे संवाद साधला होता. आता हाच प्रयोग राज्यभर राबविण्यात येणार आहे.

 बारामतीतील माळेगाव कारखान्याच्या टाकीत आठ जण गुदमरले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now Complaints regarding electricity can be lodged from home