'डेथ पास'ही आता ऑनलाईन; पुणे महापालिकेकडून सुविधा सुरू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मे 2020

एखाद्या नागरिकाचा मृत्यू झाल्यास, अंत्यसंस्कार करण्यासाठी अंत्यविधी पास महत्त्वाचा असतो. महापालिका रुग्णालय, क्षेत्रीय कार्यालय, ससून हॉस्पिटल आणि विश्रामबाग येथे पासेस देण्याची व्यवस्था महापालिकेकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु अनेकदा संध्याकाळी हे पास केंद्र बंद झाल्यानंतर अथवा ऐनवेळी कुटुंबात एखादी अघटित घटना घडली तर मयतांच्या नातेवाईकांना पास मिळविण्यासाठी पळापळ करावी लागते. ती आता करावी लागणार नाही. 

पुणे : अंतसंस्कार करण्यासाठी आता अत्यंविधी पास मिळविण्यासाठी धावाधाव करण्याची गरज नाही. अंत्यविधीचा पास आता ऑनलाइन उपलब्ध करून देण्याची सुविधा पुणे महापालिकेकडून करून देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात कोविडच्या पेशंटसाठी ही सुविधा असली, तरी ती आता अन्य कारणांने मरण पावलेल्या नागरीकांच्या कुटूंबियांना देखील या सुविधा उपलब्ध करू देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा

एखाद्या नागरिकाचा मृत्यू झाल्यास, अंत्यसंस्कार करण्यासाठी अंत्यविधी पास महत्त्वाचा असतो. महापालिका रुग्णालय, क्षेत्रीय कार्यालय, ससून हॉस्पिटल आणि विश्रामबाग येथे पासेस देण्याची व्यवस्था महापालिकेकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु अनेकदा संध्याकाळी हे पास केंद्र बंद झाल्यानंतर अथवा ऐनवेळी कुटुंबात एखादी अघटित घटना घडली तर मयतांच्या नातेवाईकांना पास मिळविण्यासाठी पळापळ करावी लागते. ती आता करावी लागणार नाही. 

अय्या खरंच, तुळशीबाग सुरू होत आहे...

कोरोनाबाधित रूग्णांचा मुत्यू झाल्यानंतर अनेकदा त्यांचे कुटूंबातील मंडळी ही क्वॉरंटाईन सेंटरमध्ये असतात. त्यांना पास काढण्यात जाता येत नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यात ही सुविधा अशा मुत्यू पावलेलच्या रूग्णांसाठी सुरू करण्यात आली. आता ती आता सर्वसामान्य नागरीकांसाठी देखील खुली करण्यात आली आहे. त्यामुळे मुत्यू झाल्यानंतर रूग्णालयातूनच त्यांच्या कुटूंबियांना अत्यंविधीच्या पाससाठी ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे पाससाठी पळापळ करावी लागणार नाही, असे महापालिकेचे उपायुक्त श्रीनिवास कंदुल यांनी सांगितले. 

 पुणे : कोथरूडवरील विघ्न थोडक्यात टळले; पहाटेपर्यंत चादणी चौकात होते चिंतेचे वातावरण

एखाद्या नागरिकाचा कुठल्याही रुग्णालयात मृत्यू झाल्यास त्याच रुग्णालयामधून पी.एम.सी केअर deathpass.punecorporation.org या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करून हा पास घेता येणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात वैकुंठ, कैलास आणि येरवडा स्मशानभूमीत संगणक बसविण्यात आले आहेत. 

शेतकऱ्यांनो, पीक कर्ज घ्यायचंय? मग चिंता नको, आता बॅंकाच घेणार ऑनलाईन...

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now Death Pass online Facility started by Pune Municipal Corporation