esakal | पुण्यातील तरुणाचा ‘अन्नपूर्णा’वर झेंडा

बोलून बातमी शोधा

डॉ. सुमीत मांदळे (डावीकडील)
पुण्यातील तरुणाचा ‘अन्नपूर्णा’वर झेंडा
sakal_logo
By
सुदाम बिडकर ः सकाळ वृत्तसेवा

पारगाव : अवसरी बुद्रूक (ता. आंबेगाव) येथील डॉ. सुमीत सुरेश मांदळे या तरुणाने जगातील दहावे उंच शिखर असलेल्या अन्नपूर्णा-१ (उंची ८०९१ मीटर) यशस्वीरीत्या सर करून गावच्या शिरपेरात मानाचा तुरा रोवला. पुण्यातील ‘गिरीप्रेमी’ संस्थेचे उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. सुमीत मांदळे, भूषण हर्षे, जितेंद्र गवारे यांनी १६ एप्रिल रोजी यशस्वी चढाई करून मानाचा तिरंगा फडकाविला.

हेही वाचा: पुणे विद्यापीठाची प्रयोगशाळा अजूनही ‘निगेटिव्ह’

नेपाळमध्ये गंडकी आणि मार्श्यगदी या हिमनद्यांनी वेढलेल्या अन्नपूर्णा शिखरावरील चढाई अत्यंत अवघड मानली जाते. सततच्या बर्फवृष्टीमुळे येथील तापमान उणे ४० अंश इतके खाली आहे. हिमालयाचा भाग असलेल्या या पर्वतरांगेत अनेक अतिउंच शिखरे असून, अन्नपूर्णा पर्वत समूह त्यात विशेष प्रसिद्ध आहे. या समूहातील ‘अन्नपूर्णा- १’ हे एकमेव शिखर आठ हजार मीटरपेक्षा उंचीचे आहे. मॉरिस हेर्झोग यांच्या नेतृत्वाखाली फ्रेंच गिर्यारोहकांनी सन १९५० मध्ये सर्वप्रथम या शिखराला गवसणी घातली होती. त्यानंतर आजवर केवळ अडीचशे गिर्यारोहकांनाच हे यश प्राप्त झालेले आहे. त्यात डॉ. सुमीत मांदळे यांचा समावेश झाला आहे.

हेही वाचा: Success Story : कोथिंबीर पिकातून शेतकरी मालामाल

डॉ. सुमीत मांदळे याने आतापर्यंत जगातील तिसऱ्या क्रमांकाचे माउंट कांचनजुंगा (८५८६ मीटर), सहाव्या क्रमांकाचे माउंट चोयू (८२०१ मीटर) ही शिखरे सर केली आहेत. त्याने सन २०१९ मध्ये झालेल्या माउंट कांचंनजुंगा मोहिमेत डॉक्टर म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली. कॅम्प -४ वर बंगालच्या २ गिर्यारोहकांचे प्राण वाचवले. त्याने आतापर्यंत दोनशेपेक्षा जास्त किल्ले व घाटवाटा पादाक्रांत केल्या आहेत. त्याने वीसपेक्षा जास्त अवघड अशा सुळक्यावर यशस्वी चढाई केली आहे.

मदतकार्यात नेहमीच पुढे

डॉ. सुमीत मांदळे हा गिरिप्रेमीच्या प्रत्येक हिमालयीन मोहिमेत डॉक्टर म्हणून महत्त्वाची जबाबदारी त्याच्यावर असते. सन २०१५ मध्ये नेपाळमध्ये झालेल्या भूकंपावेळी भूकंपग्रस्तांच्या मदत कार्य पथकात सुमीत याने वैद्यकीय मदत करण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती.