साहित्यप्रेमींसाठी मसापच्या अधिकृत संकेतस्थळावर ग्रंथ उपलब्ध 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयातील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायझेशनचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. हा दुर्मीळ ग्रंथाचा खजिना आता साहित्य रसिकांसाठी ऑनलाइन खुला केला आहे.
 

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयातील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायझेशनचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. हा दुर्मीळ ग्रंथाचा खजिना आता साहित्य रसिकांसाठी ऑनलाइन खुला केला आहे.

मसापच्या अधिकृत संकेतस्थळावर ई-दुर्मीळ ग्रंथपेढीवरून हे दुर्मीळ ग्रंथ साहित्यप्रेमींना डाउनलोड करता येणार आहेत. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या सहकार्याने दुर्मीळ ग्रंथांचे डिजिटायझेशन झाले असून, साहित्य सेतूच्या सहकार्याने निर्माण करण्यात आली आहे.

मसापच्या कार्यकारी मंडळाच्या पुढाकाराने "ग्रंथ दत्तक योजना' जाहीर करून देणगीदारांना आवाहन केले होते. पदाधिकाऱ्यांनी आणि जिल्हा प्रतिनिधींनी ग्रंथ दत्तक घेतले. याबाबत मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, "दीडशे-दोनशे वर्षांपूर्वीच्या दुर्मीळ ग्रंथांची अवस्था पाहता त्यांचे जतन करण्यासाठी डिजिटायझेशन करण्याची गरज होती. लवकरच दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.""
 
वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयाचा इतिहास 
परिषदेचे संस्थापक चिटणीस कै. वा. गो. आपटे यांच्या नावाचा "वा. गो. आपटे इस्टेट' ट्रस्ट होता. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे तत्कालिन कार्याध्यक्ष श्री. म. माटे यांनी त्या ट्रस्टच्या विश्‍वस्तांशी संपर्क साधून 1949 ला 10 हजार रुपयांची देणगी मिळवली. ट्रस्टच्या अटीनुसार आपटे यांच्या स्मरणार्थ संदर्भ ग्रंथालय उभारण्यात आले. 1951मध्ये वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयाची प्रतिष्ठापना झाली. 
 

Web Title: Now Literature available on the official website of Masap