
पुणे : ड्रोनच्या साहाय्याने अति उच्च दाब वाहिन्यांची निगा राखण्याचा निर्णय महापारेषण कंपनीने घेतला अहे. त्यामुळे या वाहिन्यांची देखभाल दुरुस्तीची कामे अचूक व जलदगतीने होण्यास मदत होणार आहे. वीज क्षेत्रात ड्रोनचा वापर करणारी महापारेषण ही देशातील एकमेव कंपनी ठरली आहे.
धक्कादायक! कोरोना रिपोर्ट न आल्याने मृतदेह दहा तास पडून...
अति उच्च दाब वाहिन्यांची देखभाल जसे ग्राऊंड पेट्रोलिंग, टॉवर टॉप पेट्रोलिंग, सर्व्हे आदी कामे महापारेषणकडून ड्रोनव्दारे करणार आहे. त्यासाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूक विभागाने महापारेषणला नुकतीच परवानगी दिली आहे. यामुळे महापारेषणचा वेळ, पैसा व मनुष्यबळाची बचत होणार आहे.
ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत व महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी महापारेषणला ड्रोन उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. प्रशिक्षित चमुद्वारे ड्रोनचा कुशल प्रकारे वापर करण्यात येणार आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
महापारेषण ही देशातील सर्वात मोठी पारेषण कंपनी असून राज्यात एकूण 681 इएचव्ही उपकेंद्रे असून 48 हजार 321 सर्किट किलोमीटरच्या पारेषण वाहिन्या आहेत. सध्या महापारेषण कडे 1 लाख 27 हजार 990 एमव्हीए क्षमतेची परिवर्तन क्षमता असून 25 हजार एमडब्ल्यू ऊर्जा हाताळणीची क्षमता असलेली पारेषण यंत्रणा आहे. विशेषतः दुर्गम भागातून जाणाऱ्या, समुद्रकिनारी व खाडीलगतच्या भागात पारेषण वाहिन्यांची कामे करताना ड्रोनचा उपयोग चांगल्या रीतीने होणार आहे.
ड्रोनवर व्हिडिओ कॅमेरा व थर्मोव्हिजन कॅमेरा लावला असल्यामुळे पारेषण वाहिन्यांवर निर्माण होणारे विविध दोष त्वरित निदर्शनास आणून त्यांची तात्काळ दुरूस्ती करणे शक्य होणार आहे. तसेच नवीन प्रकल्पाचे सर्व्हेक्षण करण्यासाठीही या ड्रोन कॅमेराचा उपयोग होणार आहे. टॉवरच्या अगदी जवळ जाऊन ड्रोनव्दारे तपासणी करणे शक्य होणार आहे.
यंदाचे अत्रे संमेलन रद्द; पिंपळे विद्यालयाचे अत्रेंच्या नावाने होणार नामकरण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.