esakal | यंदाचे अत्रे संमेलन रद्द; पिंपळे विद्यालयाचे अत्रेंच्या नावाने होणार नामकरण
sakal

बोलून बातमी शोधा

This year Acharya Atre convention canceled In Saswad Pune

आचार्य अत्रे यांच्या जन्मगावी सासवड (ता.पुरंदर) दरवर्षी होणारे अत्रे मराठी साहित्य संमेलन यंदा कोरोनामुळे रद्द केल्याचे अत्रे विकास प्रतिष्ठान व साहित्य परिषद शाखा सासवड यांच्या वतीने जाहीर करण्यात आले. मात्र, जन्मदिनानिमित्त अत्रेंचे शाळेला नाव देण्याचा कार्यक्रम होईल.

यंदाचे अत्रे संमेलन रद्द; पिंपळे विद्यालयाचे अत्रेंच्या नावाने होणार नामकरण

sakal_logo
By
श्रीकृष्ण नेवसे

सासवड : आचार्य अत्रे यांच्या जन्मगावी सासवड (ता.पुरंदर) दरवर्षी होणारे अत्रे मराठी साहित्य संमेलन यंदा कोरोनामुळे रद्द केल्याचे अत्रे विकास प्रतिष्ठान व साहित्य परिषद शाखा सासवड यांच्या वतीने जाहीर करण्यात आले. मात्र, जन्मदिनानिमित्त अत्रेंचे शाळेला नाव देण्याचा कार्यक्रम होईल.

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ही माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते यांनी दिली. १३ ऑगस्ट रोजी प्रतिष्ठानच्या कलादालनात आचार्य अत्रे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येईल. तसेच प्रतिष्ठानच्या पिंपळे येथील न्यू इंग्लिश स्कुल या माध्यमिक विद्यालयाचे नामकरण 'आचार्य प्रल्हाद केशव अत्रे विद्यालय पिपळे' असे करण्याचा समारंभ.. जन्मदिनी १३ ऑगस्टला
मोजक्या लोकांचे उपस्थितीत पिंपळ्यात होईल. शासनाचे नियम पाळले जातील; असे कोलते यांनी म्हणाले.
-----------
उत्तर भारताला पावसाचा जोरदार तडाखा; आसाममध्ये पूर
------------
राजस्थानच्या राजकारणात नवा ट्विस्ट; गृह खात्याने मागितले फोन टॅपिंग प्रकरणाचे रिपोर्ट
-------------
आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान व साहित्य परिषद शाखा सासवड यांच्या संयुक्त बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. सन १९९१ साली ग्रामस्थांच्या मागणीवरून तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार  यांनी पिपळे येथे हे अनुदानित माध्यमिक विद्यालय सुरु करण्यास मान्यता दिली होती. आज सर्व सोयींयुक्त असे विद्यालय सुरु आहे. या विद्यालयास आचार्य अत्रेंचे नाव देण्याचे भाग्य आम्हाला लाभले आहे याचा आनंद आहे; असे
जिल्हा परिषद जलसंधारण समितीचे सदस्य शिवाजी पोमण यांनी सांगितले.

या बैठकीस साहित्य परिषदेचे सासवड शाखेचे अध्यक्ष अॅड. प्रकाश  खाडे ,कार्याध्यक्ष खाजाभाई  बागवान, सदस्य रवींद्र पोमण, कला फडतरे, संस्थेच्या विश्वस्त शशिकला कोलते, सचिव शांताराम पोमण, सहसचिव हनुमंत चाचर, शिवाजी घोगरे आदी उपस्थित होते.