esakal | टु व्हिलर घेताय? आता नंबर प्लेटसाठी No Waiting
sakal

बोलून बातमी शोधा

टु व्हिलर घेताय? आता नंबर प्लेटसाठी No Waiting

टु व्हिलर घेताय? आता नंबर प्लेटसाठी No Waiting

sakal_logo
By
- मंगेश कोळपकर

पुणे : ग्राहकाला वितरकानेच दुचाकीचा नंबर देण्याच्या प्रकल्पात राज्यातील पहिली दुचाकी पुण्यात नोंदली गेली. आता या पुढे वाहन वितरकच ग्राहकाला त्याच्या वाहनाचा नंबर देणार आहे. त्यामुळे नवी गाडी घेतल्यावर नंबरसाठीचे वेटिंगचा प्रकार कालबाह्य झाला. राज्यात सोमवारपासून या योजनेला प्रारंभ झाला. (Now No Waiting for two-wheeler the number plate)

पुण्यातील साधु वासवानी चौकातील बी. यू. भंडारी या शो-रूममधून रमेश वासवानी ग्राहकाने सोमवारी घेतली. त्या दुचाकीला तत्काळ mh12tj7818 हा नंबर देण्यात आला. प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे या प्रसंगी उपस्थित होते. तत्काळ नोंदणीची डिलर पॉईंट न्यू रजिस्ट्रेशन ही पद्धत अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे पेपरवर्क कमी झाले असून ग्राहकही खूष झाले आहेत, आज आमच्याकडे तीन गाड्या या पद्धतीने नोंदल्या गेल्या, असे बी. यू. भंडारीचे सरव्यवस्थापक उमेश बोराडे यांनी सांगितले.

हेही वाचा: पुण्यात दोन राजांची भेट घडवणारे संदीप पटेल आहेत तरी कोण?

ग्राहकाने वाहनासाठी नोंदणी केल्यावर, त्याचा आधार कार्ड, पॅन क्रमांक आणि संबंधित कागदपत्रे घेतली जातात. परिवहन या संकेतस्थळावर ही कागदपत्रे अपलोड केली जातात. त्यानंतर ग्राहकाला ओटीपी येतो. त्यानंतर वितरकाकडून कर भरला जातो. लगेचच दुचाकीचा नंबर येतो. हा नंबर वितरक गाडीला बसवून देतो, असे शिंदे यांनी सांगितले.

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या बाबत पूर्वीच सूतोवाच केले होते. परंतु, नुकताच या बाबत निर्णय झाला. परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी या बाबतचा आदेश पुणे आरटीओला नुकताच पाठविला. त्यानुसार राज्यात या योजनेला प्रारंभ झाला.

नोंदणी करताना वाहन वितरक डिजीटल स्वाक्षरीचा वापर करणार आहे. नोंदणीकरिता आता वाहन किंवा कागदपत्रे आरटीओ कार्यालयात सादर करण्याची आवश्यकता नाही. यामुळे वितरक व नागरीक यांची वेळ व खर्चाची बचत होणार आहे. नवीन वाहनाची नोंदणी करताना वितरकाने नमुना २० नमुना २१, नमुना २२, डिस्क्लेमर वाहन आणि चॅसिस क्रमांकाचा फोटो, वाहनाचा फोटो, पॅन कार्ड, सातबारा उतारा, आदी कागदपत्रे पीडीएफमध्ये परिवहन या संकेतस्थळावर अपलोड करायची आहेत. त्यासाठी ई-स्वाक्षरीचा वापर करावयाचा आहे. संबंधित आरटीओ त्यास मान्यता देईल.

हेही वाचा: उदयनराजेंचा संभाजी राजेंच्या आंदोलनाला पाठिंबा

''वाहन वितरकाने नव्या वाहनाची नोंदणी केल्यामुळे ग्राहकांच्या वेळेत बचत होईल. तसेच हाय सिक्युरिटी नंबर प्लेटही वाहन वितरक पुरविणार आहे. कागदपत्रांच्या नोंदणीची जबाबदारी वाहन वितरकावर राहणार आहे. ''

- अजित शिंदे (प्रादेशिक परिवहन अधिकारी)

''या प्रक्रियेत एजंटांचा हस्तक्षेप दूर होणार अशल्यामुळे ग्राहकांना निश्चितच फायदा होईल तसेच वितकांनाही उपयोग होईल. आरटीओवरील अनावश्यक ताणही कमी होईल. परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी तत्परतेने या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे.''

- सागर पाषाणकर (पाषाणकर ऑटोमोबाईल्स)

loading image