esakal | पुण्यात दोन राजांची भेट घडवणारे संदीप पटेल आहेत तरी कोण?
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात दोन राजांची भेट घडवणारे संदीप पटेल आहेत तरी कोण?

पुण्यात दोन राजांची भेट घडवणारे संदीप पटेल आहेत तरी कोण?

sakal_logo
By
सागर आव्हा़ड

पुणे : राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. खासदार संभाजी छत्रपती यांनी ६ जूनला रायगडावरून मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या १६ जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार आहे. कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्थळावरून हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा संभाजी छत्रपती यांनी केली आहे. मराठा समाजच्या मागण्यांवर विचार नाही झाला तर पुण्यातून मंत्रालयावर लॉंगमार्च काढण्याचा थेट इशारा देखील खा. संभाजीराजे यांनी दिला आहे. यासंदर्भात खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजी छत्रपती यांची बहुप्रतिक्षीत भेट काही दिवसांपूर्वी उदयनराजे यांच्या आधीच ठरलेल्या काही कार्यक्रमांमुळे होऊ शकली नव्हती. त्यामुळे राज्यभरात उलट-सुलट चर्चांना उधान आले होते. मात्र, आज पुण्यात हे दोन्ही राजे यांच्यात बैठक झाली. (Who is Sandeep Patel who visited Udayanraje bhosale and Sambhajiraje Chhatrapati in Pune)

हेही वाचा: 'जय श्रीराम' म्हणण्यासाठी वयस्कर व्यक्तीला मारहाण, दाढीही कापली; व्हिडीओ व्हायरल

बहुचर्चित असलेली संभाजीराजे व उदयनराजे यांची भेट आज पुण्यात औंध मधील सिंध सोसायटी मध्ये झाली. दोन राजे दोन वेगवेगळ्या गेटमधून संदीप पटेल यांच्या घरी आले. संदीप पटेल हे उद्योजक आहेत. दोन्ही राजे हे त्यांचे कॉमन मित्र असल्याने त्यांनी ही भेट घडवली. मिळालेल्या माहितीनुसार, सिंध सोसायटीच्या मागील गेटने उदयनराजे आले तर पुढील गेटने संभाजी राजे आले. ही भेट मागील आठवड्यात होणार होती. मात्र काही कारणास्तव ती झाली नव्हती.

हेही वाचा: इस्रायलच्या नव्या पंतप्रधानांना मोदींनी दिल्या सदिच्छा; नेतन्याहूंना म्हणाले...

या बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत खा. उदयनराजे यांनी समाजाचा उद्रेक झाला तर आमच्यावरही हल्ला करायला ते थांबणार नाहीत. अशी वेळ येऊ देऊ नका, पण ही वेळ येणार आहे, अशी भीती व्यक्त केली आहे.आपण जात कधी पाहिलेली नाही, पण आता तर लहानपणाचे मित्रदेखील अंतर ठेवून बोलतात. ही फळी कोण निर्माण करत आहे, तर ते राज्यकर्ते करत आहेत. समाजाचा याच्याशी काही संबंध नाही. आरक्षण द्यायची इच्छाच नसून राजकारण करायचं आहे. व्यक्तीकेंद्रीत राजकारण सुरु असून उद्रेक झाला तर राज्यकर्ते जबाबदार असतील. त्यावेळी आम्हीदेखील थांबवू शकणार नाही. आम्ही आडवे आलो तर आमच्यावरही हल्ला करायला थांबणार ते नाहीत. अशी वेळ येऊ देऊ नका, पण ही वेळ येणार आहे,अशी भीती उदयनराजेंनी व्यक्त केली आहे.या दोन राज्यांना एकत्र करणारे संदीप पटेल यांनी 2 राजे एकत्र यावेत हा प्रस्ताव मांडला होता.

loading image