esakal | ‘पीएमआरडीए’चे योग्य व्हिजन हवे - महेश झगडे

बोलून बातमी शोधा

mahesh zagade

‘पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) परिसर ऑक्‍टोपससारखा पसरला आहे. त्याच्या माध्यमातून नागरिकांना प्रथम पायाभूत सुविधा मिळाव्यात, त्यासाठी पीएमआरडीएचे योग्य व्हिजन हवे,’’ असे मत निवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे यांनी व्यक्त केले.

‘पीएमआरडीए’चे योग्य व्हिजन हवे - महेश झगडे
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - ‘पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) परिसर ऑक्‍टोपससारखा पसरला आहे. त्याच्या माध्यमातून नागरिकांना प्रथम पायाभूत सुविधा मिळाव्यात, त्यासाठी पीएमआरडीएचे योग्य व्हिजन हवे,’’ असे मत निवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे यांनी व्यक्त केले.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमने आयोजित केलेल्या संवाद कार्यक्रमात ‘पीएमआरडीएचा विकास आराखडा’ या विषयावर ते बोलत होते. संयोजक तुषार शिंदे उपस्थित होते. 

#PuneMetro मेट्रोच्या कामात भूसंपादनाचा अडथळा

झगडे म्हणाले, ‘‘भविष्यात सहा कोटी लोकसंख्येच्या शहराला एफएसआय मिळेल इतकी क्षमता असतानाही पावणेतीन कोटी लोकसंख्येच्या शहराला आराखड्याची गरज काय? आतापर्यंत सरकारने किती एफएसआय उपलब्ध करून दिला व त्यापैकी किती वापरला हे कोणीही सांगणार नाही, नागरिकही विचारणा करणार नाहीत. त्यासाठी जागरूक व्हा. ७० वर्षांत विकास कामांमध्ये चुका होत आल्या आहेत, हे थांबायला हवे. पीएमआरडीए आदर्श प्रदेश असायला हवा.’’