#SPPU : पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश आता ऑनलाईन प्रवेशपरीक्षेद्वारे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

पुणे : 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमध्ये चालविण्यात येणाऱ्या पदव्युत्तर आणि पदवीच्या सर्व अभ्यासक्रमांसाठी आता ऑनलाईन प्रवेशपरीक्षा घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. 

पुणे : 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमध्ये चालविण्यात येणाऱ्या पदव्युत्तर आणि पदवीच्या सर्व अभ्यासक्रमांसाठी आता ऑनलाईन प्रवेशपरीक्षा घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. प्रवेशांमध्ये तसेच इतर शैक्षणिक प्रक्रियांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी २०१९-२० या शैक्षणिक वर्षापासून या परीक्षा घेण्यात येणार आहेत. पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचे प्रवेश मात्र संबंधित विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या ऑफलाईन प्रवेश परीक्षेद्वारे देण्यात येतील.

विद्यापीठ परिसरातील विविध विभाग आणि केंद्रामध्ये मिळून ८० पेक्षा जास्त पदव्युत्तर आणि पदवी अभ्यासक्रम चालविते जातात. सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षापासून या सर्व अभ्यासक्रमांमध्ये फक्त प्रवेश परीक्षेच्या माध्यमातूनच प्रवेश दिले जातील. त्यातील बहुतांश अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा फक्त ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. त्याखेरीज विद्यापीठातील विविध विभागांमध्ये मिळून सुमारे ७० पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालविले जातात.

संबंधित विभागांमध्ये होणाऱ्या परीक्षेद्वारे या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिले जातील. या वर्षी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात घेतली जाईल. ऑनलाईन प्रवेश अर्ज तसेच प्रवेश परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाचे उपकुलसचिव उत्तम चव्हाण यांनी दिली.

Web Title: Now Post Graduate and Post Graduate Courses entrance will be online